27 April 2024 5:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

देश आर्थिक संकटात, पण पंतप्रधान हेडलाईन बनवण्यात व्यस्त: सोनिया गांधी

Sonia Gandhi, Congress, PM Narendra Modi

नवी दिल्ली: देश दिवसागणिक आर्थिक संकटाच्या खाईत जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र, सभा-समारंभ आणि प्रसिद्धीच्या मोहात पडलेले आहेत. आर्थिक विकासाच्या झालेल्या घसरणीची कबुली देऊन त्यावर उपाययोजना करण्याऐवजी केंद्र सरकारला ती मान्यही नाही ही बाब चिंताजनक आहे, अशी टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली. सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधात काँग्रेस ५ ते १५ नोव्हेंबर या काळात देशव्यापी आंदोलन करणार असून त्याच्या तयारीसाठी सोनिया गांधी यांनी नेत्यांची बैठक बोलावली होती.

भारतात कृषीव्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. काही गोष्टी देशात आयातही केल्या जातात तर काही इथून निर्यातही केल्या जातात. मात्र जर आपल्या देशातील उपलब्ध वस्तू आयात केल्या ज्यांची किंमतही कमी असेल तर इथल्या मालाला मोल्य राहणार नाही, जसं बाजारात गेल्यावर स्वस्त असलेल्या मेड इन चायना वस्तूकडे आपण जास्त आकर्षित होतो. मात्र या स्वस्त मिळणाऱ्या वस्तूंच्या कमी दरांचं कारण आहे त्यांचं सरकार. काही देशांचं सरकार त्यांना कर्ज, निर्यात करणाऱ्यांना सबसिडी उपलब्ध करुन देते त्यामुळे त्यांना इथे स्वस्त दरात वस्तू देणं सोयीचं ठरतं, पण याबाबतीत भारताची स्थिती काहीशी वेगळी आहे. कर्जाचे डोंगर असलेल्या शेतकऱ्यांना आता आयात होणाऱ्या शेतमालाचाही सामना करावा लागणार आहे.

तत्पूर्वी, इस्रायलच्या पिगॅसस सॉफ्टवेअरद्वारे करण्यात आलेल्या हेरगिरीवरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘मोदी सरकारनेच इस्रायलच्या ‘पिगॅसस’ सॉफ्टवेअरद्वारे सर्वांची हेरगिरी केली आहे. असं करणं असंविधानिक आहेच, शिवाय लज्जास्पदही आहे,’ अशा शब्दात सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता.

हॅशटॅग्स

#Soniya Gandhi(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x