मुंबई : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ‘संविधान वाचवा, देश वाचवा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होत. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आणीबाणीच्या काळातील इंदिरा गांधींचा दाखला देत हे वक्तव्य केलं.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळाबद्दल बोलताना पवार म्हणाले की,’इंदिरा गांधींनी देशातील गरिबांसाठी खूप कामं केली, पण जेव्हा त्यांनी देशाच्या संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा याच देशातील नागरिकांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीसारख्या मोठ्या नेत्यांना धडा शिकवला होता. त्यामुळे मोदींनाही जनता तसाच धडा शिकवेल, असं शरद पवार आवर्जून म्हणाले.
मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना जे गोध्रा हत्याकांड घडलं होत त्याचा दाखला देत पवार म्हणाले की, गोध्रा हत्याकांड केलं त्या दोषींवर कारवाई करण्याऐवजी निर्दोष लोकांची हत्या झाल्याचं चित्र होतं, असं पवारांनी सांगितलं.
गोळवरकर गुरुजींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाबाबत एका पुस्तकाच्या माध्यमातून टीका केली होतीआणि त्यांच्या विचारांवर चालणारा भाजप पक्ष आहे असं पवार म्हणाले. त्यामुळे भारताच्या संविधानाबाबत भारतीय जनता पक्षाकडून कितीही चांगली वक्तव्यं होत असली तरी ती धादांत खोटी असल्याची जळजळीत टीका शरद पवारांनी भाजप पक्षावर केली.
