16 December 2024 12:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

कोरोनामुळे ६४ वर्षीय वरिष्ठ नागरिकाचा कस्तुरबा इस्पितळात मृत्यू

Corona Virus, Senior Citizen Dead at kasturba Hospital

मुंबई, १७ मार्च: कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या आणि मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. संबंधित रुग्ण हा ६५ वर्षांचा होता. या संदर्भातील माहितीला मुंबई महापालिकेने दुजोरा दिला आहे. या रुग्णाला आधीपासून मधुमेह आणि इतरही काही आजार होते. मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे महाराष्ट्रात मृत्यू झाल्याची ही पहिली घटना आहे.

भारतात करोनामुळे आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या मृत्यूची नोंद कर्नाटकात झाली होती. कर्नाटकमध्ये ७९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राजधानी दिल्लीत दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यात दिल्लीमधील राम मनोहर लोहिया रुग्णालयात ६८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे.

दरम्यान, कस्तुरबा रुग्णालयातील इतर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. देशात करोनाची लागण झालेल्या सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. केरळ, ओडिशा, उत्तर प्रदेशमध्ये नवे रुग्ण सापडल्याने भारतातील एकूण करोना रुग्णांची संख्या १२७ वर पोहोचली आहे.

 

News English Summery: A coronary infected and hospitalized at Kasturba Hospital in Mumbai died on Tuesday morning. The corresponding patient was 65 years old. The information has been confirmed by the Mumbai Municipal Corporation. This patient already had diabetes and some other illnesses. He died on Tuesday morning. This is the first case of death in Maharashtra due to corona virus infection. All other patients at Kasturba Hospital are stable. They have also been informed that necessary treatment is underway.

 

News English Title: Story because of Corona Virus senior citizen patient passes away at Mumbai Kasturba Hospital News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x