3 May 2024 6:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

पात्रा म्हणाले औवेसी देशाचे नवे जिन्ना; पण अडवाणी जिन्ना यांना 'धर्मनिरपेक्ष' म्हणाले होते

MIM MP Owaisi, muhammad ali jinnah, BJP Leader Sabit Patra

नवी दिल्ली: संसदेत बहुमताने सुधारित नागरिकत्व कायदा पारित झाल्यानंतर देशातील काही भागात हिंसक आंदोलन होत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष जबाबदारीने वागत नसल्याचं दिसून येतं. राजकीय पक्षांनी आपापल्या ओवैसींना मुस्लिम मतांसाठी उतरविले आहे. औवेसी देशाचे नवे जिन्ना आहेत असा आरोप भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.

दरम्यान, संबित पात्रा यांनी जरी खासदार औवेसी यांना देशाचे नवे महंमद अली जिन्ना म्हटलं असलं, तरी त्याच पाकिस्तानचे जनक समजले जाणाऱ्या जिन्ना यांना भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सेक्युलर असं त्यांच्या पश्चात प्रशस्तिपत्रक दिलं होतं. पाकिस्तानचे जनक महंमद अली जीना यांना मुस्मिांची संख्या अधिक असलेले परंतु, धर्मनिरपेक्ष राष्ट्र हवे होते, या आपल्या विधानाचा भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पुनरूच्चार केला होता. पात्यानंतर त्यांना पक्षाध्यक्ष पद सोडावे लागले होते.

जीना यांच्याबाबतीत हे माझे वैयक्तिक मत असल्याचे सांगत अडवाणी यांनी पुन्हा एकदा त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले होते. २००५ मध्ये त्यांनी आपल्या पाकिस्तान दौऱ्यात जीना यांना धर्मनिरपेक्ष संबोधल्यामुळे गदारोळ उडाला होता. त्यांच्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षातील अनेक नेत्यांनी ताशेरे ओढले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची वेळ आली होती. अखेर त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करून या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. पाकिस्तानचे पत्रकार एम. जे. अकबर यांच्या ‘टिंडरबॉक्स-द पास्ट अँड फ्युचर ऑफ पाकिस्तान’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आपल्या वाक्याचा पुनरूच्चार केला होता.

लोकसभेत विरोधी पक्षनेते असताना अडवाणी यांनी पाकिस्तान भेटीत ४ जून २००५ रोजी महंमद अली जीना यांच्यावर स्तुतिसुमने उधळल्यानंतर संघाचा चरफडाट झाला होता, मात्र जिना यांच्याविषयीच्या वक्तव्यावर अडवाणी नंतरही ठाम राहिल्याने, ते संघाच्या काळ्या यादीत गेले. त्यावेळचे सरसंघचालक सुदर्शन यांचा तो सूर पुढे नवनियुक्त सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यांतूनही उमटत होता.

नंतरच्या लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवानंतर अडवाणी यांना थेट बाजूला न करता, त्यांनी विरोधी पक्षनेतेपद सोडावे अशी व्यूहनीती करण्यात आली. जानेवारी २०१० मध्ये अडवाणी यांच्या जागी सुषमा स्वराज यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. याच दरम्यान पक्षाचे नेतृत्वही नितीन गडकरी यांच्याकडे आले आणि पक्षात नवनेतृत्वाचा जमाना सुरू करण्याच्या संघाच्या इच्छेची फळे दिसू लागली.

 

Web Title:  MIM MP Owaisi Jinnah a New India BJP has Taken Aggressive Post Making Serious Allegations Against over Opposition

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x