3 May 2025 12:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

नाराज आमदारांचे वेगवेगळे आकडे दाखवून प्रसार माध्यमंच संभ्रम पसरवत आहेत? सविस्तर वृत्त

Shivsena, NCP, Congress

मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांतील नाराजांनी मोठ्या प्रमाणावर डोकं वर काढल्याच्या कपोकल्पित बातम्या पेरण्याचं पेव सध्या प्रसार माध्यमांमध्येच आल्याचं पाहायला मिळत आहे. वास्तविक मंत्रिमंडळ वाटपापूर्वी आणि नंतर लॉबिंग तसेच नाराजीनाट्य काही नवा विषय नाही. शपथविधीच्या दिवशी खासदार संजय राऊत यांचा नाराजीनाट्याच्या वृत्तानंतर त्यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली असताना देखील त्यांच्या ट्विटरवरील पोस्टवरून भलतेच चित्र रंगविण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळाल्यामुळे राष्ट्रवादीच्या एका आमदाराच बंड देखील वरिष्ठांसोबतच्या बैठकीनंतर अधिकृतरीत्या थंड झालं आहे. रामदास कदम मुळात विधानसभेचे आमदार नाहीत आणि त्यांना यापूर्वी अनेक महत्वाची पद मिळाली आहेत. मात्र शिवसेनेत मागच्या चुका टाळून विधानपरिषदेवरील आमदारांना आराम देत जनमाणसातून निवडून आलेल्यांना संधी देण्यात आली आणि त्यातून खऱ्या अर्थाने संभाव्य बंड शिवसेनेने आधीच क्षमवलं आहे असं म्हटलं जातं. त्यामुळेच रामदास कदम आणि दिवाकर रावते यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवले. मात्र शिवसेना नैतृत्वाने सरसकट तसा विचार नसल्याचं सुभाष देसाई यांना मिळालेल्या मंत्रिपदावरून समोर येतं.

दुसरीकडे पुण्यात काँग्रेसचे नाराज आमदार संग्राम थोपटे यांच्या समर्थकांनी थेट काँग्रेसचे पुण्यातील कार्यालय फोडल्याने माध्यमांचे केमेरे तेथे वळले खरे, मात्र आता त्या आमदारांनी देखील हात वर केले असून ते माझे समर्थक कार्यकर्ते नसल्याचं म्हटलं आहे. मात्र सध्या अनेक टीव्ही वृत्त वाहिन्यांवर आणि वृत्त पत्रांमध्ये १२ आमदार नाराज आणि १४ आमदार नाराज अशा बातम्या पेरण्यात सुरुवात झाली आहे. दरम्यान ते १२-१४ आमदार नक्की कोणत्या पक्षाचे आणि त्यांची नावं काय हे देखील स्पष्ट करण्यात आलेलं नाही. तसेच नाराजांची आकडेवारी फुगवून दाखवण्यासाठी त्यात पुन्हा रामदार कदम, दिवाकर रावते, रवींद्र वायकर अशा आमदारांसोबत खासदार भावना गवळी यांचं देखील नाव जोडण्यात आलं आहे.

वास्तविक २८८ आमदारांच्या महाराष्ट्रात १४५ हा बहुमताचा आकडा असून त्यात ४५ आमदारांना कायदेशीर मंत्रिपदं देण्याची तरतूद आहे. म्हणजे कोणाचंही सरकार आलं तरी हेच वास्तव राहणार. मात्र महाविकास आघाडीचं सरकार असल्याने आमदार नाराज असल्याचं चित्र रंगवणं सुरु आहे. वास्तविक ३ पक्षांचं सरकार असल्याने तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या आमदारांच्या संख्येत केवळ दोन आमदारांचा फरक असला तरी महत्वाचं असं मुख्यमंत्रीपद सेनेला देण्यात आलं आहे आणि परिणामी काही महत्वाची खाती राष्ट्रवादीच्या पदरात पडणं साहजिकच आहे असं तज्ज्ञांना वाटतं.

दुसरीकडे भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचे १०४ आणि सहकारी अपक्ष आमदार असे जवळपास ११८-१२० आमदार आहेत. मात्र नजीकच्या काळात त्यातील अनेक राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गळाला लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हा संभ्रम कायम ठेवण्यात येत असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडीकडील आमदार संख्या आणि भाजपकडील आमदार संख्या यांच्यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे भाजपाची सत्ता येईल हे केवळ स्वप्नवत आहे. कारण एकवेळ फेरनिवडणूक लागतील पण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे आमदार गळाला लावून भाजपचं सरकार देखील टिकणार नाही हे देखील वास्तव आहे. त्यात नाराजांनी राजीनामा देण्याच्या कितीही बाता मारल्या तरी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र असल्याने पुन्हा निवडून येणं देखील सोपं नाही.

तसेच आमदारांच्या नाराजी नाट्यावरून पत्रकारांच्या अनेक व्हाट्सअँप ग्रुपवर भाजप समर्थक असल्यासारख्या इमोजी आणि एडिटेड फोटो शेअर करण्याचे प्रकार बरंच काही सांगून जातं आहेत असंच म्हणावं लागेल. त्यात भाजप देखील स्वतःचे निवडून आलेले १०४ आमदार केवळ भाजपच्या मतदारांच्या बळावर निवडून आल्याच्या स्वप्नात आहे. शिवसेनासोबत नसल्याने ते देखील थेट ३५-४० वर येऊन पडतील याची त्यांना देखील कल्पना आहे. फायदा झालाच तर तो केवळ मुंबई आणि आसपासच्या शहरी भागात होईल जेथे गुजराती मतदार मोठ्या संख्येने आहे. मात्र ग्रामीण भागात शिवसेनेशिवाय अत्यंत दयनीय अवस्था होईल असं चित्र आहे. त्यामुळे सरकारला आता काम करू द्यावं आणि कपोकल्पित वृत्तांपासून माध्यमांनी दूर राहावं असं मत अनेक राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

 

Web Title:  Does Media spreading roamers about MLAs of MahaVikas Aghadi.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)#NCP(372)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या