पुणे: केसरी स्पर्धेची अंतिम लढत चांगलीच अटीतटीची झाली. कारण या सामन्यात पहिला गुण शैलेश शेळकेने पटकावला होता. त्यानंतर हर्षवर्धन सदगीरने एक गुण मिळवत बरोबरी केली होती. त्यानंतर सामन्याला एक मिनिट शिल्लक असताना हर्षवर्धन सदगीर १-२ अशा पिछाडीवर होता. पण अखेरच्या 20 सेकंदात हर्षवर्धनने खेळ पालटविला, हर्षवर्धनने तिहेरी पट काढून 2 गुण घेतले आणि बाजी मारली. हर्षवर्धनने अंतिम लढतीचा सामना ३-२ असा जिंकत जेतेपद पटकावले.

पुण्याच्या बालेवाडीत ६३व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. कालच्या सामन्यात गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी विजेता बाला रफिक शेख आणि उप महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांचा धक्कादायक पराभव झाला होता. त्यामुळे आज नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर आणि लातूरच्या शैलेश शेळकेमध्ये होणाऱ्या अंतिम लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यासाठी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: उपस्थित होते. पवार यांच्या उपस्थितीतच हा सामना रंगला.

शैलेश आणि हर्षवर्धन हे एकाच तालमीत शिकत असल्यामुळे दोघांनाही एकमेकांची बलस्थानं आणि कच्चे दुवे माहिती होते. पहिल्या डावात दोघांनीही बचावात्मक खेळ केला. अति बचावात्मक कुस्ती खेळल्यामुळे पंचांनी शैलेश शेळकेला एक गुण बहाल केला. दुसऱ्या डावातही दोन्ही मल्ल एकमेकांना वरचढ होण्याची संधी देत नव्हते. दुसरा डाव संपायला येत असताना हर्षवर्धननेही एक गुण कमावत बरोबरी साधली. मात्र शेवटच्या १-० सेकंदात हर्षवर्धनने निर्णयाक डाव टाकत महत्वाच्या दोन गुणांची कमाई करत मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला.

 

Web Title:  Maharashtra Kesari Kusti final Harshvardhan Sadgir won reputed Maharashtra Kesari.

नाशिकचा हर्षवर्धन ठरला यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’