26 April 2024 11:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

राज ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक; मनसे-भाजप एकत्र येण्याचे संकेत?

Former CM Devendra Fadnavis, Raj Thackeray

मुंबई: माजी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली आहे अशी माहिती समोर येते आहे. दुपारी ३.३० वाजता फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली. या दोघांमध्ये १ तास चर्चा झाली असे समजते आहे. २३ जानेवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या झेंड्याचा रंगही बदलणार आहे.

प्रभादेवीच्या हॉटेल इंडिया बुल्स स्कायमध्ये आज ही गुप्त भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांसोबत एकही सहकारी आणि सुरक्षा रक्षक नव्हता. हॉटेलच्या मागच्या दाराने राज ठाकरे यांनी प्रवेश केला. त्यानंतर काही वेळाने फडणवीस यांनी पुढील दरवाजातून प्रवेश केला. या बैठकीसाठी अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. दोन्ही पक्षातील कुणालाही या बैठकीची कल्पना देण्यात आली नव्हती. यावेळी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे मित्र गुरुप्रसाद रेगे हेच उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील मिळू शकला नसला तरी राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही भेट असेल, असं सूत्रांनी सांगितलं.

त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनीही भाजपासोबत युतीकरण्याबाबत सूचक संकेत दिले होते. ”आजवर शिवसेनेपासून शेकापपर्यंत सर्वच पक्षांना आम्ही मदत केली. पण, या सर्वांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला किती मदत केली, त्याचा आम्हाला किती फायदा झाला हे तपासण्याची वेळ आली आहे. लोक बदल स्वीकारण्यास तयार असून भविष्यात कोणतीही राजकीय समीकरणे जुळू शकतात, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचे संकेत दिले होते.

 

Web Title:  Former Chief Minister Devendra Fadanvis meet MNS Chief Raj Thackeray in Mumbai Today.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x