14 May 2024 2:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स पाहिजेत का? हा 51 रुपयाचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढवा Suzlon Share Price | सकारात्मक अपडेट! सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये तेजी, पण स्टॉकमधील तेजी पुढे कायम राहील? IPO GMP | लॉटरी लागणार! हा IPO शेअर पहिल्याच दिवशी 100 टक्केपेक्षा जास्त परतावा देणार, GMP संकेत Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक येणार तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस प्राईस Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल स्टॉकला या प्राईसवर पुलबॅकचे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा अलर्ट EPFO Online Claim | पगारदारांसाठी अलर्ट! तुमचा नंबर सुद्धा त्यात नाही ना? पुढे क्लेम सेटलमेंट कशी असेल? Mobile Recharge Hike | बापरे! कोट्यवधी मोबाइल युजर्सना झटका लागणार! मोबाईल रिचार्ज खर्च 25% वाढणार
x

इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ क्षेपणास्त्र हल्ला

Iraq, Rocket Missile Hit, US Army, President Donald Trump

बगदाद: इराणने इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर २२ क्षेपणास्त्रे डागल्याने इराण आणि अमेरिकेतील संघर्ष तीव्र झाला असतानाच बुधवारी रात्री उशिरा पुन्हा एकदा इराकची राजधानी बगदादमधील सुरक्षेची तटबंधी असलेल्या ग्रीन झोनमध्ये दोन कत्युशा क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. या हल्ल्यात कोणतीही हानी झालेली नाही असा दावा, इराकी सैन्याने केला आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या दूतावासापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर यातील एक क्षेपणास्त्र कोसळले. दरम्यान, या हल्ल्याची अद्याप कुणीही जबाबदारी घेतलेली नाही.

इराणने इराकमधील अमेरिकी फौजांच्या २२ ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. मात्र, त्यात इराकचे कुणीही मारले गेलेले नाही, असे इराक लष्कराने स्पष्ट केले. इराणी माध्यमांनी मात्र या हल्ल्यात अमेरिकेचे ८० सैनिक ठार केल्याचा दावा केला. सध्या इराकमधील तळांवर अमेरिकेचे एकूण पाच हजार सैनिक तैनात आहेत.

अमेरिकन दूतावासाजवळ झालेल्या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही. याआधी बुधवारी इराणनं इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर २२ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. इराणचे लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला संबोधित केलं. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं ट्रम्प म्हणाले.

 

Web Title:  Two Rockets missiles Hit Iraqi Capitals Green Zone Security Sources.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x