2 May 2024 6:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

भारताचे माजी अष्टपैलू कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचे मुंबईत निधन

Cricketer Bapu Nadkarni Passes Away

मुंबई: भारताचे माजी अष्टपैलू कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचे मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे. बापू नाडकर्णी पवईतील हिरानंदानी गार्डन येथे मुलीकडे राहत होते. तिथेच आज त्यांची प्राणज्योत मालवली. बापूंच्या निधनाने एक बुजुर्ग आणि भारतीय क्रिकेट विश्वातील जुनाजाणता क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड गेला आहे.

महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात ४ एप्रिल १९३३’मध्ये बापू नाडकर्णी यांचा जन्म. रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी असे त्यांचे पूर्ण नाव, परंतु क्रिकेटविश्व त्यांना बापू नाडकर्णी याच नावाने ओळखतं. त्यांनी ४१ कसोटी २५.७०च्या सरासरीनं एक शतक आणि ७ अर्धशतकांसह १४१४ धावा केल्या, तर गोलंदाजीत २९.०७च्या सरासरीनं ८८ विकेट्स घेतल्या. १९६८’मध्ये त्यांनी अखेरचा कसोटी सामना खेळला होता.

१२ जानेवारी १९६४ रोजी बापू नाडकर्णी यांनी इंग्लंडविरुद्ध एकही धावा न करता सलग १३१ चेंडू टाकले होते. हा सामना मद्रास (आताचे चेन्नई) येथे खेळला गेला, त्या सामन्यात भारताने पहिल्या डावात ४५७ धावा केल्या होत्या. त्या सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावादरम्यान बापू यांनी एकूण २९ षटके टाकली होती, त्यामध्ये २६ ओव्हर मेडन होत्या.

 

Web Title:  Former Indian Cricket team all rounder test cricketer Bapu Nadkarni passes away in Mumbai.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x