28 April 2024 1:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
x

उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांचे फोन टॅपिंग प्रकरण; सरकारकडून चौकशीचे आदेश

CM Uddhav Thackeray, Sharad Pawar, Sanjay Raut

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या माजी ज्येष्ठ मंत्र्याने माझा फोन टॅप होत असल्याचं सांगितलं होतं, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. फडणवीस सरकारने आपल्या काळात तत्कालीन विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप झाल्यानंतर राऊतांनी ट्विटरवरुन हा दावा केला आहे.

‘तुमचा फोन टॅप होत आहे, ही माहिती मला भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ मंत्र्याने दिली होती. मी म्हणालो होतो, भाईसाहेब, माझं बोलणं कोणाला ऐकायचं असेल, तर स्वागतच आहे. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिष्य आहे. कोणतीही गोष्ट लपून छपून करत नाही. ऐका माझं बोलणं’ असं संजय राऊत यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.

महाविकास आघाडी सरकारनं यापूर्वी झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं विरोधी पक्षातील नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी केला होता. दिग्विजय सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे फोन टॅप झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

सरकारने विधानसभा निवडणुकीच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे फोन व विशेषत: व्हॉट्सअ‍ॅप मेसेज टॅप केल्याचा आरोप केला गेला होता. त्याविषयी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही प्रसारमाध्यमांसमोर काही आरोप केले होते. यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फोन टॅपिंग प्रकरणी सायबर सेलला चौकशीचे आदेश दिले असल्याचे सांगितले आहे.

 

Web Title:  Maharashtra State Government orders inquiry phone tapping of CM Uddhav Thackeray Sharad Pawar and Sanjay Raut.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x