27 April 2024 10:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

उंबार्ली टेकडी आग प्रकरण: सखोल चौकशी संदर्भात आ. राजू पाटील यांचं पोलीस आयुक्तांना पत्र

MNS MLA Raju Patil, Dombivali Urbali Hills fire

डोंबिवली: डोंबिवलीजवळील निसर्गरम्य टेकडी आणि कावळ्याचा गाव म्हणून परिचित असलेल्या उंबार्ली टेकडीला २५ जानेवारीला दुपारच्या वेळी अज्ञात व्यक्तीने आग लावली. उन्हाचा पारा वाढलेला असल्यामुळे ही आग काही क्षणात सर्वत्र पसरली. यामुळे टेकडीचा बराचसा भाग जळून खाक झाला आहे. आगीत या टेकडीवर लावण्यात आलेले अनेक डेरेदार वृक्ष होरपळले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तातडीने धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवले. या भागाचे झपाट्याने नागरिकरण होत असून भूमाफियांनीच ही आग लावली असावी, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, डोंबिवली शहराचा आक्सिजन म्हणून उंबार्ली टेकडी परिचित आहे आणि या आगीमागे षढयंत्र असण्याची शक्यता असल्याने सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी असं पत्र मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिलं आहे. आजूबाजूच्या भागात मोठ्या प्रमाणावर नागरिकरण वाढत असून भविष्याची आखणी करून काही भूमाफियांनीच ही आग लावल्याचं स्थानिकांच म्हणणं आहे आणि त्यासाठी स्वतः आमदार राजू पाटील यांनी पुढाकार घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून प्रकरण तडीस न्यावे आणि गुन्हेगारांना शासन व्हावे यासाठी पत्र व्यवहार सुरु केला आहे.

दरम्यान, उंबार्ली टेकडीला आग लागली त्या टेकड्यांच महत्व त्यांनी पोलीस प्रशासनाच्या नजरेस आणून दिलं आहे आणि विषयाचे गंभीर वेळीच ओळखून कल्याण-डोंबिवलीचा होणारा नैसर्गिक ऱ्हास वेळीच थांबवावा अशी आशा व्यक्त केली आहे. काय म्हटलं आहे आ. राजू पाटील यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या लेखी पत्रात.

 

Web Title:  MNS MLA Raju Patil gave letter to Thane Police Commissioner regarding Dombivali Urbali Hills fire.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x