13 October 2024 2:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest | 5 वर्षांसाठी केलेली FD 1 वर्षातच तोडायची असल्यास व्याज मिळेल की उलट पैसे कापले जातील No Cost EMI | नो कॉस्ट EMI खरंच फायद्याचा असतो, खरंच फ्री सुविधा मिळते का, असा असतो खेळ - Marathi News Nippon India Small Cap Fund | बापरे, महिना रु.10,000 SIP करा, ही योजना 1 कोटी 53 लाख रुपये परतावा देईल - Marathi News TCS Share Price | टाटा ग्रुपचा IT शेअर देणार मोठा परतावा, TCS स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TCS Manmauji Movie Release Date | एका तरुणासाठी स्त्रियांना झालंय प्रेमाचं लागीर, 'मनमौजी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर IREDA Share Price | PSU IREDA शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | डिफेंस क्षेत्रातील शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

उत्तर प्रदेश: थरारनाट्य संपलं; सुभाष बाथम मारला गेला; २० मुलांची सुटका

Farrukhabad psycho man

लखनऊ: उत्तर प्रदेशमधील फर्रुखाबादमध्ये एका इसमानं ओलीस ठेवलेल्या २० लहान मुलांची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सुटकेच्या कारवाई दरम्यान एनएसजी कमांडोंशी झालेल्या चकमकीत आरोपी सुभाष बाथम मारला गेला आहे. तब्बल ११ तासांनंतर हे थरारनाट्य संपलं असून कारवाईत सहभागी असलेले पोलीस व एनएसजी पथकाला १० लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारनं केली आहे.

या कारवाईत पाच पोलिसांसह सहा नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच आरोपीच्या घरातून एक रायफल आणि पिस्तुलही जप्त करण्यात आली. काही लोकांनी आरोपीच्या गरावर दगडफेक केली. यामध्ये आरोपीच्या घराचा दरवाजा तुटला आणि याचाच फायदा पोलिसांना झाल्याचं सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी या घराभोवती वेढा घातला होता. मात्र, सायंकाळपर्यंत पोलिसांना मुलांची सुटका करण्यात अपयश आले. यानंतर ओलीस ठेवलेल्या मुलांची आणि महिलांची सुटका करण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाला बोलावण्यात आल्याची माहिती कानपूर मंडळाचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी दिली होती. तसेच, राज्य सरकारकडून एनएसजी कमांडोची मागणी करण्यात आली. मात्र, ११ तासानंतर आरोपी सुभाषचा खात्मा करण्यात उत्तर प्रदेश पोलिसांना यश आले आणि मुलांची सुटका करण्यात आली.

 

Web Title:  Farrukhabad psycho man who held children hostage killed police encounter while all children are rescued.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x