2 May 2024 8:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

शिवभोजन थाळीमुळे तिजोरीवर भार वाढला; त्यामुळे १ रुपयात आरोग्य तपासणीला ग्रहण

Shivbhojan Thali

मुंबई : गरीब आणि गरजूंना फक्त १० रुपयांत जेवणाची थाळी देणाऱ्या ‘शिवभोजन’ योजनेची २६ जानेवारीपासून राज्यभरात अंमलबजावणी झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेचा आज आढावा घेतला होता आणि त्यानंतर या योजनेच्या अंमलबजावणीचे निर्देश दिले होते.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवभोजन योजनेची घोषणा केली होती. त्यानंतरमागील महिन्याच्या अखेरीस मंत्रिमंडळानं या शिवभोजन योजनेला मान्यता दिली होती. ती सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ३ महिन्यांत ६ कोटी ४८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला ५० ठिकाणी शिवभोजन योजनेंतर्गत १० रुपयांत जेवणाची थाळी देण्यात येणार होती, ज्याची सुरुवात झाली आहे.

त्यामुळे आजारावर निदानासाठी केवळ १ रुपयात आरोग्य तपासणी ही योजना तिजोरीत खडखडाट असल्याने गुंडाळण्याची वेळ आघाडी सरकारवर आली आहे. शिवसेनेच्या वचननाम्यात ही योजना असून राष्ट्रवादीची इच्छा असूनही निधीअभावी योजनेला ग्रहण लागल्याचे वृत्त आहे. ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी केली. त्यानंतर दहा रुपयांत शिवभोजन थाळी आली. यात स्टॉल चालवणाऱ्याना थाळीमागे ४० रुपये अनुदान आहे. यामुळे तिजोरीवर अतिरिक्त भार आला. राज्यावर सध्या सुमारे ६ लाख कोटी कर्जाचा डोंगर आहे. त्यात शिवसेनेने शिवभोजन थाळी सुरू केल्याने गरिबांसाठी असलेली आरोग्य योजना अडचणीत आली आहे.

१ रुपयात आरोग्य तपासणी योजना अतिशय चांगली आहे. ती राबवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचीसुद्धा तीव्र इच्छा आहे. आरोग्यमंत्री म्हणून ही योजना सुरू करण्याचा माझा प्रयत्न आहे. मात्र, निधीची कमतरता असल्याने तूर्त ती राबवली जाऊ शकत नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

 

Web Title:  Shivbhojan Thali additional load increased health check up at rupee one is cancelled.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x