4 May 2024 7:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

दिल्लीत संसदेच्या अधिवेशनाला जाण्यापूर्वी पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

Sharad Pawar

मुंबई, १५ जुलै | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आज (15 जुलै) संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. पण यापैकी तीन मुख्य विषयांवर सर्वाधिक चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात जवळपास अर्धा तास बैठक झाली. शरद पवार उद्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. त्यामुळे ते पुढचा आठवडाभर दिल्लीतच राहणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती आहे.

१९ जुलैपासून संसदेचं अधिवेशन सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना-राष्ट्रवादीची काय भूमिका आणि मुद्दे असावेत यावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर कृषी विषयक प्रश्नांचा आढावा घेतला. या बैठकीला राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संदीपान भुमरे उपस्थित होते. या बैठकीनंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक आहेत. त्यामुळे या मुद्द्यांवर संसदेत काय भूमिका मांडावी, या विषयावरही चर्चा झाल्याच सांगण्यात येत आहे.

पवार उद्या दिल्लीत जाणार आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूीमीवर ते दिल्लीत जाणार असून ते आठवड्याभर तिथे राहणार असल्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक विषय चर्चेसाठी आहेत. केंद्र सरकारने सहकार क्षेत्राचं नवं खातं निर्माण केलं आहे. या खात्याचे सर्व सूत्र अमित शाह यांच्याकडे देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात सहकार क्षेत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचं चांगलं वर्चस्व आहे. सहकार क्षेत्राशी अनेक मुद्दे संबंधित आहेत. पुढच्या काळात केंद्र सरकारचा राज्यांच्या सहकार क्षेत्रावर हस्तक्षेप होऊ शकतो, अशी धास्ती आहे. त्यामुळे या विषयावर बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCP president Sharad Pawar meet CM Uddhav Thackeray before moving to Delhi of Parliament monsoon session news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x