4 May 2024 11:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार? Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक
x

सुपडा साफ होणार! मोदी-शहा, २०० खासदार, ७० केंद्रीय मंत्री, ११ मुख्यमंत्री फुसके बार ठरणार: सर्व्हे

Delhi Assembly Election 2020, CM Arvind Kejariwal, BJP, Modi Shah

नवी दिल्ली : बहुचर्चित दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्ष मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सत्ता मिळविणार हे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील ७० जागांपैकी ५४ ते ६० जागांवर आम आदमी पक्षाचा विजय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

टाइम्स नाऊ आणि इप्सोसने (आयपीएसओएस) संयुक्तरित्या केलेल्या या सर्वेक्षणामध्ये दिल्लीकरांनी आपला पसंती दिल्याचे दिसत आहे. ५२ टक्के दिल्लीकरांनी आपच्या पारड्यात मत दिले आहे तर ३४ टक्के जनतेने भाजपाला मत दिले आहे. सध्याची परिस्थिती पाहिल्यास भाजपाच्या मतांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता या सर्वेक्षणामधून दिसत आहे. २०१५ साली झालेल्या निवडणुकीपेक्षा यंदा आपला कमी मते मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. २०१५ साली आपला ५५ टक्के मते मिळाली होती. यंदा हा आकडा ५२ टक्के इतका असेल असा अंदाज आहे.

तत्पूर्वी, ‘सी व्होटर’ केलेल्या सर्वेक्षणात ‘आप’ला ५४ ते ६४ म्हणजे सरासरी ५९ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. गेल्यावेळी मिळालेल्या जागांच्या तुलनेत यंदा कमी जागा मिळतील असा अंदाज होता. तर, भारतीय जनता पक्षाला ३ ते १२, काँग्रेसला ० ते ६ अशा जागा मिळण्याचे सर्वेक्षणात म्हटले होते. विधानसभेत सत्ता मिळविण्यासाठी ३६ जागांची आवश्यकता आहे. काँग्रेस यंदा भोपळा फोडू शकते, असेही म्हटले आहे.

दरम्यान, “आम्ही जी विकासकामं केली आहेत, त्यावरच आम्ही मतं मागणार आहोत. जर आम्ही गेल्या ५ वर्षात तुमची कामं केली असं वाटत असेल तरच आम्हाला मत द्या. जर तुम्हाला वाटत असेल तरच आम्हाला सत्तेत पुन्हा येण्याची संधी मिळायला हवी”, निवडणुक आयोगाने तारखांची घोषणा केल्यानंतर केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सदर वक्तव्य केलं होतं.

दरम्यान, केजरीवाल यांनी विकासाच्या मुद्यांवर भारतीय जनता पक्षाला घाम फोडल्याचे पाहायला मिळत आहे. झारखंड मधील पराभवानंतर भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करून तगडी फौज केजरीवालांविरोधात उभी करणार असल्याचं चित्र आहे. त्यासाठी देशभरातील तब्बल २००, खासदार, ७० केंद्रीय मंत्री आणि ११ विद्यमान आणि माजी मुख्यमंत्री दिल्लीमध्ये प्रचारासाठी दिल्लीत तळ ठोकून आहेत.

 

Web Title:  AAP Party could win 54 60 seats BJP will failed says Times Now Psos Opinion Poll.

हॅशटॅग्स

#Kejariwal(7)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x