6 May 2024 3:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली
x

यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपला धक्का, शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी

Shivsena MLC Candidate Dushyant Chaturvedi, Yavatmal

यवतमाळ: यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला धक्का बसला आहे. शिवसेनेच्या तिकीटावर रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी विजयी झाले आहेत, तर भारतीय जनता पक्षाच्या सुमित बाजोरिया यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

यवतमाळ विधानपरिषद पोट निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांना पहिल्या पसंतीची २९८ मते मिळाली. तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुमित बाजोरिया यांना १८५ मते मिळाली तर ६ मतं बाद ठरली होती.. विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निडणुकीत महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी आणि भारतीय जनता पक्षाचे सुमित बाजोरिया यांच्यात ही थेट लढत झाली होती.

यवतमाळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतून शिवसेनेचे तानाजी सावंत विधानपरिषदेचे सदस्य होते. ते उस्मानाबादमधून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्या जागी माजी मंत्री सतीष चतुर्वेदी यांचे चिरंजीव दुष्यंत चतुर्वेदी यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. चतुर्वेदींनी अवघ्या ६ महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. या निवडणुकीपूर्वी सुरक्षेच्या दृष्टीने मतदारांना सहलीही घडविण्यात आल्या होत्या. तसेच महाविकास आघाडीने आपल्या मतदारांकडून एकजुटीची शपथ घेतली होती. तसेच अवैध मतदान टाळण्याच्या दृष्टीने गुरुवारी नागपुरात मतदारांकडून प्रत्यक्ष मतदानाचे प्रात्यक्षिकही महाविकास आघाडीने करून घेतले होते.

 

Web Title:  Shivsena MLA Candidate Dushyant Chaturvedi wins Yavatmal legislative council election.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x