2 May 2024 12:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

राज्यात आज ३३०७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Maharashtra, Covid 19, Corona Virus, Rajesh Tope

मुंबई, १७ जून : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. मुंबईत कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने ६० हजारांचा टप्पा पार केला आहे. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता २९ दिवसांवर पोहचला आहे. तर रुग्ण वाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन आता 2.43 टक्क्यांवर आहे.

एफ उत्तरमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून तब्बल ६० दिवसांवर पोहोचला आहे. तर रूग्ण वाढीचं प्रमाण १.२ टक्के असं सर्वात कमी आहे. एच पूर्वमध्ये रुग्ण दुप्पट व्हायला ५७ दिवस लागलेले असून तेथील रुग्ण वाढीचा सरासरी दर एफ उत्तरप्रमाणे 1.2 टक्के असाच आहे.

दरम्यान, राज्यात आज ३३०७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत राज्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या १ लाख १६ हजार ७५२ वर पोहोचली आहे. याशिवाय दिवसभारत ११४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ५६५१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

आज १३१५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५९ हजार १६६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घऱी गेले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला ५१ हजार ९२१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी एकट्या मुंबईत २६ हजार ९९७ रुग्ण आहेत.

 

News English Summary: Today, 3307 new coronavirus patients have been registered in the state. Besides, the number of coronary heart disease patients in the state has reached 1 lakh 16 thousand 752. Besides, 114 deaths have been reported in India during the day. So far 5651 people have died due to corona in the state.

News English Title: Today 3307 new coronavirus patients have been registered in the Maharashtra state News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x