4 May 2024 4:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

सांगली: राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी सभापतीची धारदार शस्त्राने हत्या

Sangli Kawthemahakal, NCP leader Manohar Patil Murder

कवठेमहांकाळ: सांगली जिल्ह्यात राजकीय नेत्यांच्या खुनाचं सत्र सुरूच आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या एका हत्येचा उलगडा होत नाहीत तोच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर पाटील यांची हत्या झाली आहे. त्यामुळं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मनोहर पाटील हे कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती होते. देशींग इथं अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. राजकीय वैमनस्यातून हा खून झाला असावा, असा पोलिसांचा कयास आहे.

दरम्यान, हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनोहर पाटील यांना ग्रामस्थांनी उपचारासाठी मिरज येथील मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकूण ३ संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

मनोहर पाटील हे कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली गावचे रहिवाशी होते. या गावचे ते उपसरपंच राहिले होते. २०१७ मध्ये पंचायत समिती सदस्यपदाची निवडणूक त्यांनी लढवली आणि ते विजयी देखील झाले होते. कवठेमहांकाळ पंचायत समिती सभापती पदही त्यांनी भूषवलं होतं. सध्या मनोहर पाटील हे कवठेमहांकाळ येथील महाकाली साखर कारखान्याचे संचालक होते. विशेष म्हणजे ४ दिवसांपूर्वी पलूस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नेते आनंदराव पाटील यांची हत्या झाली होती. आनंदराव पाटील यांच्या डोक्यात वार करून हल्लोखोर पसार झाले होते.

 

Web Title:  NCP leader Manohar Patil Murder in Sangli Kawthemahakal.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x