2 May 2024 1:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
x

पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज वर्ष पूर्ण; शहीद वीर जवानांना श्रद्धांजली

CRPF Attack

नवी दिल्ली: पुलवामा येथे सीआरपीएफच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या घटनेला आज वर्ष पूर्ण झालं. भारतीय सैन्याच्या तब्बल ४० जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या विदारक घटनेचे व्रण प्रत्येक भारतीयाच्या मनात ताजे आहेत. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर गेल्या वर्षी १४ फेब्रुवारी रोजी भ्याड हल्ला झाला. या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते.

उमेश गोपीनाथ जाधव यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मूळ गावी जाऊन तेथील माती जमा केली आहे. यासाठी त्यांना संपूर्ण देशात तब्बल ६१ हजार किलोमीटरचा प्रवास करावा लागला आहे. गेल्याच आठवड्यात जाधव यांचा प्रवास संपला या प्रवासाला जाधव मोठ्या अभिमानाने ‘तीर्थ यात्रा’ असं संबोधतात. प्रत्येक जवानाच्या गावी जाऊन येथील माती एका कलशामध्ये जमा करुन सर्व कलश एकत्र करुन जाधव श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.

सीआरपीएफने गेल्या वर्षी पुलवामा हल्ल्यानंतर एक ट्विट केलं होतं. ‘आम्ही विसरणार नाही, आम्ही माफ करणार नाही. पुलवामा हल्ल्यातील शहीदांना अभिवादन करतो आणि आपल्या शहीद बांधवांच्या कुटुंबियांसमवेत आम्ही उभे आहोत. या भयंकर हल्ल्याचा बदला घेतला जाईल’ असं ट्विटमध्ये म्हटलं होतं.

 

Web Title: Pulwama attack Umesh Jadhav collected soil from all CRPF Martyrs home.

हॅशटॅग्स

#Indian Army(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x