7 May 2024 11:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतात हे 1 ते 9 रुपये किंमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास फायद्याची सरकारी योजना, 8.2% व्याजासह इतर फायदेही मिळवा Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची खास पसंती या फंडाच्या योजनेला, दरवर्षी 54 टक्के दराने परतावा मिळतोय EPF Interest Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यात EPF व्याजाचे पैसे जमा झाले का? पटापट तपासून घ्या, अपडेट आली ICICI Mutual Fund | पैसे गुंतवा आणि हमखास दुप्पट परतावा घ्या, ही म्युच्युअल फंड योजना आहे खास फायद्याची Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु
x

मनसे आमदाराच्या पाठपुराव्याला यश; दिशा कायद्याची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री आंध्रप्रदेशात

Home Minister Anil Deshmukh, Andhra Pradesh Disha Act

हैदराबाद: महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना चाप बसावा यासाठी राज्यात कठोर कायदा आणण्यासाठी राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. आंध्रप्रदेश सरकारने आणलेल्या दिशा कायद्याची माहिती घेऊन त्याची अंमलबजावणी कशी करता येईल यासंबंधिची माहिती जाणून घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख आंध्रप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत.

गृहमंत्र्यांच्या हैद्राबाद दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत गृहराज्यमंत्री सतेज पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल हे देखील उपस्थित आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. हिंगणघाट तरुणीला जिवंत जाळून हत्या प्रकरणानंतर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने सुध्दा आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे.

तत्पूर्वी, मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आंध्र प्रदेश सरकार प्रमाणे बलात्कार आणि महिला अत्याचारासंबंधित “दिशा कायदा” महाराष्ट्रात देखील अमलात आणावा यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देऊन विनंती केली होती. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून भाजप सरकारच्या काळातील प्रकल्प रद्द करण्यासाठी शक्ती पणाला लावल्याचं दिसलं आणि त्यात तिन्ही सत्ताधारी पक्ष हातात हात धरून एकत्र आल्याचे दिसले. मात्र सत्ताधाऱ्यांनी तशीच एकी आणि इच्छा शक्ती मनसे आमदार राजू पाटील यांनी दिलेल्या संवेदनशील सूचनेकडे देऊन आंध्र प्रदेश प्रमाणे कायदा महाराष्ट्रात अमलात आणला असता तर हिंगणघाट जळीत प्रकरणातील आरोपीला २१ दिवसात शिक्षा सुनावत आली असती. परंतु आमदार राजू पाटील यांचं १७ डिसेंबर २०१९ मधील ते पत्र राजकीय चष्म्यातून आणि गांभीर्यातून न घेतल्याने सरकारवर आम्ही हे करू आणि ते करू अशी वेळ आली, अशी चर्चा सुरु झाली होती.

त्यामुळे उद्या अशा खटल्यातील आरोप सुटले किंवा विलंब झाल्यास सरकार कोंडीत अडकणार असल्याने सरकारच्या वतीने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं सूचित करण्यात आलं होतं. राज्यातील शिष्टमंडळ महिला अत्याचार आणि बलात्कार अपराधांच्या संबंधित दिशा कायद्याचं स्वरूप समजून घेणार असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे उद्या अभ्यासाअंती हा कायदा महाराष्ट्रात अमलात आल्यास ते मनसेसाठी देखील मोठं यश असले हे निश्चित.

काय होतं ते मुख्यमंत्र्यांना दिलेलं नेमकं पत्रं

 

English summary: Story home minister Anil Deshmukh visits Andhra Pradesh state for information find about Disha Act in the state after MNS MLA Raju Patil followup with State Government.

 

Web Title: Story home minister Anil Deshmukh visits Andhra Pradesh state for information find about Disha Act in the state.

हॅशटॅग्स

#RapeCase(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x