5 May 2024 4:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

गुजरात: मोटेरा स्टेडिअमच्या बाहेरील गेटमधून ट्रम्प आत जाणार होते; तो गेटच कोसळला

US President Donald Trump, Gujarat Tour, PM Narendra Modi

अहमदाबाद : देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून नावारूपाला येत असलेले सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्टेडियम उद्घाटनासाठी सज्ज झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष या स्टेडिअममध्ये येणार आहेत. मात्र, आज एक धक्कादाय़क घटना घडली आहे. या स्टेडिअममध्ये ज्या गेटमधून ट्रम्प जाणार होते ते तात्पुरते उभारलेले गेटच कोसळले आहे. यामुळे ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या आदल्या दिवशीच ही घटना घडल्याने सीआयए सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची शक्यता आहे.

अहमदाबादमधील या मोटेरा स्टेडिअममध्ये ट्रम्प यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मोटेरा स्टेडिअमच्या बाहेर उभ्या केलेल्या तात्पुरत्या गेटमधून आत जाणार होते. हे गेटच शनिवारी कोसळले. या गेटच्या आसपास कोणीही नसल्याने दुर्घटना टळली आहे. दौऱ्याच्या आदल्या दिवशीच ही घटना घडल्याने चौकशी सुरू झाली आहे.

दुसरीकडे ट्रम्प भारतात येणार असले तरी, दोन्ही देशांमध्ये व्यापारावरुन मतभेद कायम आहेत. ट्रम्प यांच्या दौऱ्यात कुठल्याही व्यापारी करारावर स्वाक्षऱ्या होणार नाहीत. भारतात येण्यापूर्वी ट्रम्प यांनी व्यापाराच्या मुद्दावरुन आपली नाराजीही प्रगट केली आहे. भारताने अमेरिकेला चांगली वागणूक दिली नाही असेही ट्रम्प म्हणाले होते.

भारताबरोबर व्यापाराविषयी चर्चा करणारे अमेरिकेच्या वाणिज्य खात्याचे प्रतिनिधी रॉबर्ट लाइथायजर या दौऱ्यामध्ये भारतात येणार नाही. विशेष म्हणजे त्यांनी याआधीही भारताचा दौरा रद्द केला होता. ‘आम्ही भारत सरकारमधील अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहोत. भारताबरोबरील व्यापारी व आर्थिक संबंध अमेरिकेसाठी महत्त्वाचे आहेत. मात्र, हे संबंध समतोल असावेत, अशी आमची इच्छा आहे,’ याकडे या अधिकाऱ्याने लक्ष वेधले.

 

Web Title: Story Gate worlds largest stadium collapsed just one day before Inauguration US President Donald Trump.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x