नवी दिल्ली : नौदलाच्या एमआयजी २९ के (MiG-29K) या लढावू विमानाला पुन्हा एकदा अपघात झालाय. रविवारी सकाळी गोव्यामध्ये हा अपघात झाल्याची माहिती समोर येतेय. अपघात झाला तेव्हा या विमानानं प्रशिक्षणासाठी उड्डाण घेतलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाचे मिग २९K हे लढाऊ विमान नेहमीत सरावाच्या वेळी अरबी समुद्रात कोसळले. ब्लॅक पँथर जथ्यामधील हे अत्याधुनिक लढाऊ विमान तांत्रिक कारणानं समुद्रात कोसळलं असल्याची शक्यता नौदलाने व्यक्त केली आहे. या विमानाचा पायलट सुरक्षितपणे बचावला असून या संपूर्ण घटनेची चौकशीचे आदेश नौदलाने दिले आहेत.

 

Web Title: Story Indian Navy advanced MIG 29K Aircraft on routine Training sortie Crashed Goa.

गोवा: नौदलाचं अत्याधुनिक MiG-29K विमान कोसळलं, पायलट सुरक्षित