28 April 2024 11:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

आरे आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारकडून कोणताही निर्णय नाही

Aarey Protestant, MahaVikas Aghadi

मुंबई: कोरेगाव-भीमा प्रकरणातील ३४८ गुन्हे मागे घेण्यात आले असून मराठा आंदोलनातील ४६० गुन्हे मागे घेण्यात आल्याचं सांगतानाच शेतकरी आंदोलनातील गुन्हेही लवकरच मागे घेण्यात येतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. तसेच आपल्याविरोधीतील बाजू असणाऱ्यांना तत्कालीन फडणवीस सरकारने शहरी नक्षलवादी संबोधल्याचा टोलाही त्यांनी लगावला. तसेच या प्रकरणातील इतरही अनेक गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

विधान परिषदेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. कोरेगाव-भीमा प्रकरणातील ६४९ पैकी ३४८ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. मराठा आंदोलनातीलही ५४८ पैकी ४६० गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. तसेच कोरेगाव-भीमा प्रकरणातील उरलेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे. हे गुन्हे किरकोळ स्वरुपाचे आहेत. मात्र सार्वजनिक मालमत्तेचं करण्यात आलेलं नुकसान आणि पोलिसांवरील हल्ल्यांबाबत दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येणार नाही, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं.

मात्र दुसऱ्या बाजूला मुंबईतील जागृत तरुणांनी आरेतील झाडांची कत्तल रोखण्यासाठी लोकशाही पद्धतीने जोरदार आंदोलन पुकारलं होतं. त्यानंतर अनेक तरुणांवर फडणवीस सरकारने गुन्हे नोंदविले होते. त्यावर महाविकास आघाडीने गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली होती, मात्र त्यावर आज पर्यंत कोणत्याही हालचाली झाल्या नसल्याचं समोर आलं आहे. त्यानुषंगाने या आंदोलकांनी सत्यजित तांबे यांच्या मध्यस्तीने गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली आणि त्यासंदर्भात निर्णय घेण्याची विनंती सरकार दरबारी केली आहे. स्वतः सत्यजित तांबे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

 

News English Summery: On the other hand, the vigilant youths of Mumbai had called for a strong democracy in a democratic way to stop the slaughter of the oak trees. After that, the Fadnavis government had registered crimes against many youths. It had announced that the development front should withdraw the crime, but there has been no movement on it till date. Accordingly, the agitators met Satyajit Patil, the Home Minister in the midst of Satyajit Tambe and requested the government to take a decision in this regard. Satyajit Tambe himself informed by tweeting.

 

Web Title: Story No decision over Aarey Protestant from MahaVikas Aghadi government.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x