2 May 2024 8:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

RBI'ला दणका! क्रिप्टोकरन्सीवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली

Crypto currency, Bitcoin, Supreme Court of India, RBI

नवी दिल्ली: क्रिप्टोकरन्सीचा वापर करण्यावरून देशातील बँकांवर घातलेली बंदी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. या प्रकरणी रिझर्व्ह बँकेने एप्रिल २०१८ मध्ये जारी केलेले आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविले. न्या. रोहिंटन नरिमन यांच्या नेतृत्त्वाखालील तीन सदस्यीय खंडपीठाने हा आदेश दिला.

रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या निर्णयाला इंटरनेट एँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याचा रिझर्व्ह बँकेला मुळात अधिकारच नाही. कारण ही काही करन्सी नाही. तर आभासी प्रकार आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक त्यावर बंदी घालू शकत नाही, असा युक्तिवाद संघटनेकडून करण्यात आला.

आरबीआयच्या पत्रकाने घातलेल्या निर्बंधांना आव्हान देण्यासाठी इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयात सुवाणीवेळी याचिका कर्त्यांनी सांगितलं की, केंद्रीय बँकेच्या निर्बंधामुळे क्रिप्टोकरन्सीमध्ये होणाऱ्या वैध व्यवहारांवरही मर्यादा आल्या. यावर आरबीआयने न्यायालयात उत्तर दिलं. त्यात म्हटलं की, क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ पुरवलं जाण्याचा धोका असल्यानं हे पाऊल उचललं.

२०१८ मध्ये आभासी चलन बिटकॉइनचं महत्व आणि किंमत वाढत होती. अनेकांनी बिटकॉइनच्या सहाय्याने मोठी कमाई करत नफा मिळवला होता. बिटकॉइनचा वाढता वापर लक्षात घेता आरबीआयने त्याला चलन म्हणून मान्यता देण्यास नकार दिला होता. सोबतच बिटकॉइनमध्ये ट्रेडिंगमुळे होणाऱ्या नुकसानासाठी आरबीआय जबाबदार राहणार नाही असंही स्पष्ट केलं होतं.

 

News English Summery: The Supreme Court on Wednesday upheld the ban on banks in the country from using Crypto currency. The Supreme Court upheld the order issued by the Reserve Bank in April 2018 in this case. Justice The three-member bench headed by Rohinton Nariman passed the order. The decision by the Reserve Bank was challenged by the Internet and Mobile Association of India in the Supreme Court. The Reserve Bank basically has no right to ban Crypto currency. Because it is not a currency. So there is the virtual type. Therefore, the Union argued that the Reserve Bank could not ban it.

 

Web News Title: Story story Supreme Court ends RBIs 2018 ban on banks dealing in Crypto currency.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x