माझे पहीले वहिले प्रेमपत्र
तुझे झिडकारून फाडणे
माझे ते घायाळ हृदय
तुझे ते मघाळ बोलणे

तुझे मेघांसारखे बरसणे
तुझी ती घट्ट मिठी
तुझे सौंदर्य मला मोहने
तुझे वर्णन माझ्या ओठी

माझ्या एकांताचे पेटते मन
तुझ्या विरहाची गाणी
माझ्या विरहाचे दान
तुझी भिजलेली पापणी

तुझ्या त्या गुलाबी ओठांना
माझे ते ओघळत स्पर्शने
तुझ्या मनाची घालमेल
माझ्या आनंदाची स्पंदने

तुझा डोळ्यातला लटका राग
तरी माझे तुलाच पाहणे
माझ्या नुसत्या खोड्या
तुझे ते सुमधुर लाजणे

तुझ्या ओठातले अबोल बोल
माझ्या ओठातले शब्दाश्रू
तुझ्या पायातले ते काटे
तुझ्या डोळ्यातले ते अश्रू

तुझे ते क्षणातील गूढ हसणे
जणू गालावरची मोहक खळी
माझे अंगभर नुसते शहारणे
जणू गुलाबाची नाजूक पाखळी

तुझ्या हृदयातले माझे प्रेम
तुझ्या सवेत जीवनाचे नवीन रंग
तुझ्या माझ्या आठवणींचे क्षण
आयुष्यभर राहतील माझ्या संग

ते चित्र तुझे माझ्याच नयनी
तुझ उदास माझ्याविना बसने
डोळ्यात माझ्या तुझेच प्रतिबिंब
दिसत समोर मी तुझे मोहरणे

तुझ्या सवेत प्रेमाची नवी सुरुवात
तुझ्या सवेत जीवन जगण्याचा अर्थ
तुझ्या प्रेमाच्या मनमोहक सुगंधात
तुझ्यातच गवसलेला माझा परमार्थ

तुझा चेहरा म्हणजे चांदण्यातील चंद्र
तू माझे एका रात्री पाहिलेले स्वप्न
शीतल प्रकाशातील मनमोहक दृश्य
तु माझे सकाळी तुटलेले अधुरे स्वप्न

जुन्या अनुभवातून नवीन शहानपण
जुन्या रडकथे नंतर नवीन हास्य कथा
पुन्हा तोच फुलपाखरू उमलत्या कळीवर
तुझ्या प्रेमाच्या बेरीज अन वजाबाकीची गाथा

नभात मेघ दाटुनी पडलेली अंधारी
एका दवबिंदू प्रमाणे माझ्यात तुझे ओघळणे
क्षणात पावसाच्या आलेल्या जणू सरी
एका थेंबा प्रमाणे माझ्या मिठीत तुझे विरणे

लेखक: पियुष खांडेकर

तूच माझी…….