12 December 2024 2:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL
x

EPFO Passbook | नोकरदारांनो! EPF बॅलेन्स चेक करण्यासाठी हे 4 मार्ग आहेत बेस्ट, घरबसल्या होईल काम - Marathi News

Highlights:

  • EPFO Passbook
  • शिल्लक रक्कम तपासण्यासाठी ऑफलाइन मार्ग जाणून घ्या – EPFO Member Portal
  • ऑनलाइन पद्धत देखील आहे सोपी – EPFO Login
EPFO Passbook

EPFO Passbook | ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य नीधी संघटन लवकरच ग्राहकांसाठी खुशखबर घेऊन येणार आहे. लवकरच ग्राहकांच्या ईपीएफ खात्यामध्ये व्याजाची रक्कम पाठवण्यात येणार आहे. त्याचबरोबर ईपीएफओ खातेधारकांना त्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम अगदी सहजरीत्या पाहता येणार आहे. पीएफ खातेधारकांसाठी रिटायरमेंटनंतर ईपीएफओ हा एक चांगला ऑप्शन असतो.

दरम्यान कर्मचाऱ्यांच्या ईपीएफओ खात्यात त्याच्या पगारामधील 12% आणि नियोक्ताकडून मिळणारा 12% भाग अशा दोन्ही भागांमध्ये हे योगदान विभागले गेले आहे. एक भाग (EPF) तर, एक भाग (EPS) मध्ये जातो. ही सर्व रक्कम आणि शिल्लक रक्कम किती आहे हे चेक करण्यासाठी या पद्धती तुम्हाला माहित असायला हव्या.

शिल्लक रक्कम तपासण्यासाठी ऑफलाइन मार्ग जाणून घ्या

1) मिस्ड कॉल :
फक्त एक मिस्ड कॉल देऊन ईपीएफ खात्यातील रक्कम जाणून घेण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर UAN नोंदणीकृत क्रमांकाची रजिस्टर असला पाहिजे. त्यामुळे तुम्ही 011-22901406 या क्रमांकावर कॉल केल्याबरोबर आपोआपच कॉल कट होईल. कॉल कट होताच तुमच्या मोबाईलवर एक एसएमएस येईल. ये एसएमएसवर क्लिक केल्यावर तुम्हाला शिल्लक रक्कम माहित करून घेता येईल.

2) एसएमएस :
एसएमएस करून शिल्लक रक्कम चेक करण्यासाठी सर्वप्रथम UAN नोंदणीकृत क्रमांकशी तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर म्हणजेचं लिंक असला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला 7738299899 या दिल्या गेलेल्या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. एसएमएस करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीची भाषा निवडू शकता. मेसेज समोर गेल्याबरोबर तुम्हाला लगेचच खात्याची शिल्लक रक्कम पाहता येईल.

ऑनलाइन पद्धत देखील आहे सोपी

1) उमंग ॲप :
उमंग ॲप हे भारत सरकारद्वारा आणले गेलेले ॲप आहे. या ॲपमार्फत तुम्ही अनेक प्रकारच्या सरकारी सेवांचा लाभ घेऊ शकता. ऑनलाइन पद्धतीने ईपीएफ बॅलेन्स चेक करण्यासाठी उमंग ॲप अत्यंत फायदेशीर ठरतो. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला हा ॲप डाऊनलोड करायचा आहे. त्यानंतर ईपीएफओ विभागात जाऊन लॉगिन करण्यासाठी पासवर्ड आणि तुमचा UAN नंबर फील करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही शिल्लक रक्कम अगदी सहजरित्या तपासू शकता.

2) पासबुक पोर्टल :
पासबुक पोर्टलद्वारे ईपीएफ बॅलेन्स चेक करण्यासाठी सर्वप्रथम ईपीएफओ सदस्य पासबुक पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवर जा. लॉगिन करण्याकरिता UAN नंबर आणि पासवर्ड टाकून घ्या. त्यानंतर ज्या खात्याचा बॅलेन्स चेक करायचा आहे त्या खात्यावर क्लिक करा. पुढे पीएस पासबुकवर क्लिक करून संपूर्ण शिल्लक पाहून घ्या.

Latest Marathi News | EPFO Passbook Balance Check 16 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPFO Passbook(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x