7 May 2025 4:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

"माझी मैत्रीण"

Marathi Kavita, Majhi Maitrin, written by Piyush Khandekar

अल्लड खट्याळ बोल घेवडी
चंचल निरागस ती प्रेम वेडी

रागावून घालते हाताची घडी
स्वप्नात रमलेली प्रेम वेडी

तार प्रेमाची ह्रुदयात ती छेडी
प्रियसी प्रेमाची ती प्रेम वेडी

क्षणा- क्षणात ती नाती जोडी
क्षणी त्या आठवांची प्रेम वेडी

मनाला माझ्या तिची गोडी
निस्वार्थी मानाची प्रेम वेडी

स्वार्थ ना कशात तिला मोडी
स्वार्थी विश्वासाची प्रेम वेडी

लेखक: पियुष खांडेकर

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या