29 April 2024 7:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

लोकांच्या भीतीचा फायदा घेत कोरोनावरील उपचारासाठी बोगस गोळ्यांची विक्री

Fake Medicines, Corona Virus

मुंबई, १८ मार्च: ‘करोना’ विषाणूला रोखण्यासाठी राज्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असल्या तरी करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. पुण्यात एक महिला करोनाग्रस्त असल्याचं निदान झालं आहे. त्यामुळं राज्यातील ‘करोना’ रुग्णांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे.

सामान्य लोकांनी कोरोनाव्हायरसचा धसका घेतला आहे. आपल्याला कोरोनाव्हायरस होऊ नये, म्हणून आवश्यक ती काळजी घेतली जाते आहे. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि याचाच गैरफायदा घेतला जात आहे. लोकांच्या भीतीचा फायदा घेत काही जण बनावट मास्क आणि सॅनिटायझर्स बनवत आहेत. पुण्यात असे तब्बल २७ लाख रुपयांचे सॅनिटायझर्स जप्त करण्यात आलेत, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.

मात्र आता कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी थेट खोट्या औषधांची विक्री छुप्या मार्गाने सुरु झाल्याचं धक्कादायक वृत्त झी न्यूजने दिलं आहे. १०- १० मिनिटांनी ही औषधं खाल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यामुळे कोरोना व्हायरसची लागणही रोखता येते असं सांगत संबंधित विक्रेत्याने या औषधांची विक्री केली.

कोरोना बरा करण्याच्या नावाखाली विकण्यात आलेली ही औषधं विकण्यात आली खरी. पण, त्यांच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारची तारीख, उत्पागकांची माहिती वगैरे नमूद करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे अखेर विषय पोलिसांकडे पोहोचविण्यात आला. ज्यानंतर लगेचच पोलीस आणि एफडीएची चक्र फिरली आणि या बोगस औषधं विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. सौ ग्राम का देडसौ…. असं म्हणत नागरिकांच्या जीवाशी सुरु असणारा हा खेळ एका ठिकाणी थांबला. दुकानाचे मालक नितेश पांड्या याच्यावर गुन्हा दाखल केला गेला. असं असलं तरीही नागरिकांनीही अशा फसव्या जाहिरातबाजीला भुलणं धोक्याचं आहे.

 

News English Summery:  The growing outbreak of the Corona virus is bringing woe to all. There are several measures being taken to prevent the spread of the virus that is disrupting the administration and the daily life of ordinary citizens. However, there is a black market for selling corona drugs in the wrong way. The cold-blooded Ayurvedic reservoir in Mulund is under the name of Chakka Corona. This black business has been exposed in a sting operation carried out by Zee 24 Hours. Sales of these drugs are on sale, saying that they take pills from hot water twice a day and cure corona.

 

News English Title:  Story sting operation Ayurvedic Bhandar on Corona Virus pandemic watch video News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Pune(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x