29 April 2024 2:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार?
x

कोरोना आपत्ती: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची प्रकृती खालावल्याने आयसीयूत

Covid19, Corona Crisis, United Kingdom PM Boris Johnson

लंडन, ६ एप्रिल: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे सध्या करोनाशी लढा देत आहेत. गेल्या आठवड्यात त्यांना लागण झाल्याचं समोर आलं होतं. स्वतःच विलगीकरण केल्यानंतरही जॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं सोमवारी त्यांना रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच जॉन्सन यांची प्रकृती आणखी खालावली आहे. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं आहे.

बोरिस यांना कोरोनाची लागण होऊन दहा दिवस पूर्ण झाले आहेत. डॉक्टरांच्या एका चमूच्या देखरेखीखाली बोरिस यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र त्यांची प्रकृती सोमवारी दुपारी खालावली त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यावरुन त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे. बोरिस हे आयसीयूत असल्यानं त्यांच्या पदाची संपूर्ण जबाबदारी परराष्ट्रमंत्री डोमनिक रॉब यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर त्यांनी देशातील जनतेला पत्राच्या माध्यमातून आवाहन केले, ‘घरात सुरक्षित राहा. परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे.’ अशी विनंती त्यांनी पत्रातून केली होती.

याशिवाय ब्रिटनच्या पीएमओनेही यासंबंधी ट्वीट करत बोरिस यांच्या प्रकृतीची माहिती दिली. ‘बोरिस यांना इस्पितळात भरती करण्यात आलं आहे. घाबरण्यासारखं काही कारण नाही आणि जॉनसनच देशाचा कारभार पाहत आहेत आणि देशाचे प्रमुख म्हणून काम करत आहेत.’ आयसोलेशन दरम्यानही बोरिस यांनी काम करणं सोडलं नव्हतं. ते व्हिडिओद्वारे आपल्या जनतेशी संवाद साधायचे. शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये बोरिस जॉनसन यांनी प्रकृतीत सुधार असल्याचं सांगितलं होतं.

 

News English Summary: British Prime Minister Boris Johnson is currently fighting Corona. Last week, she was diagnosed with an infection. It was decided to move him to the hospital on Monday, after Johnson’s disposition did not improve after his own separation. Meanwhile, Johnson’s condition has worsened as he is being treated at the hospital. So they have been moved to the ICU.

 

News English Title: Story United Kingdom PM Boris Johnson moved to ICU as Corona Virus symptoms worsen Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x