3 May 2024 5:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

देशात कोरोनाबाधितांचा आकडा ८३५६ वर, १२७ रुग्णांना डिस्चार्ज

Covid19, Corona Crisis, India Corona Crisis

नवी दिल्ली, १२ एप्रिल: भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. भारतात विदेशी नागरिकांसह कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा ८ हजार ३५६ वर पोहचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत रविवारी ही माहिती दिली. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात कोरोनामुळे २७३ रुग्णांचा मृत्यू झाला तर कोरोनाबाधितांचा आकडा ७ हजार ३७६ वर पोहचला होता. तर २४ तासांमध्ये कोरोनाचे आणखी ९०९ रुग्ण आढळले आहेत. तर ३४ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

तसेच कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष हॉस्पिटलची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये विशेष आरोग्य अधिकारी नियुक्त केला जात आहे. तामिळनाडूत ३५० खाटांचे हॉस्पिटल उभारण्यात आलं आहे. केरळात ९०० खाटांचे हॉस्पिटल कोरोनाग्रस्तांसाठी उभारण्यात आलं आहे. विविध राज्यात त्याठिकाणच्या सरकारच्या माध्यमातून फक्त कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी उभारण्यात येत आहे. मुंबईत ७०० खाटांचे विशेष हॉस्पिटल सोयीसुविधांसह सज्ज आहे असंही सांगितले.

लव अग्रवाल यांनी पुढे सांगितले की, ‘महाराष्ट्रात सर्वाधिक १२७ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर मध्य प्रदेशमध्ये ३६, गुजरातमध्ये २२, पंजाबमध्ये ११ आणि दिल्लीमध्ये १९ कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.’ देशातील २७ राज्य आणि सर्व केंद्र शासित प्रदेशांपैकी कोरोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तर देशभरात आतापर्यंत ७१६ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

 

News English Summary: A special hospital has been set up to treat Corona patients. A special health officer is being appointed at each hospital. A 350-bed hospital has been set up in Tamil Nadu. A 900-bed hospital has been set up in Kerala for coronary patients. In different states, the government is setting up only for the treatment of coronas. The 700-bed special hospital in Mumbai is well-equipped.

News English Title: Story Corona virus union government have ready One Lakh 5 thousand beds dedicated 601 hospitals corona Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x