7 May 2024 9:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

फेसबुक-जिओ डीलमुळे जागतिक गुंतणूकदार भारताकडे आकर्षित होतील - आनंद महिंद्रा

Covid 19, Corona Crisis, Anand Mahindra, Mukesh Ambani

मुंबई, २२ एप्रिल: फेसबूककडून बुधवारी एक मोठी घोषणा करण्यात आली. रिलायन्स उद्योग समूहातील जिओचे १० टक्के समभाग खरेदी करण्याची घोषणा फेसबूककडून करण्यात आली. ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर अर्थात ४३,५७४ कोटी रुपये फेसबूककडून जिओमध्ये गुंतविण्यात येणार आहेत. भारतातील सोशल मीडियामध्ये आपला परीघ आणखी विस्तारण्यासाठी फेसबूककडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

या गुंतवणुकीमुळे जिओ प्लॅटफॉर्म्सला मोठा फायदा होणार आहे. जिओ अँप प्लॅटफॉर्मचं मूल्य वाढून ४.६२ लाख कोटी रुपये होईल. या करारामुळे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजवरील कर्ज आणखी कमी होईल आणि मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबुकला एक मजबूत प्लॅटफॉर्म मिळेल. फेसबुक आणि जिओ विविध प्रोजक्टवर एकत्रितपणे काम करणार आहे, ज्यामुळे देशभरात व्यवसायाच्या संधी निर्माण होतील, असं दोन्ही कंपन्यांनी आपल्या वेगवेगळ्या जारी केलेल्या वक्तव्यांमध्ये म्हटलं आहे.

या करारावरुन आनंद महिंद्रा यांनी टि्वट करुन मुकेश अंबानी यांचे मोठे कौतुक केले आहे. ब्राव्हो मुकेश, हा केवळ दोन कंपन्यांमधील करार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. आनंद महिंद्रा यांनी म्हटले की, कोरोना विषाणूच्या संकटानंतर भारतीय अर्थव्यवस्था जगासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. २१ वे शतक भारताचे असेल ही कल्पना या करारामुळे प्रत्यक्षात येईल. विकासाचे केंद्र म्हणून जग भारताकडे पाहील.

 

News English Summary: After Facebook and Jio Deal industrialist Anand Mahindra tweeted about the deal and praised Mukesh Ambani. “It’s not just an agreement between two companies, Bravo Mukesh,” he said. Anand Mahindra said the Indian economy is very important to the world after the Corona virus crisis. The agreement will make India’s 21st century a reality. India will look to India as the center of development.

News English Title: Story bravo Industrialist Mukesh Anand Mahindra tweets after Reliance Jio Facebook deal Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x