11 May 2025 9:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
National Pension Scheme | पगारदारांना महिना 1000 रुपये गुंतवणुकीतून प्रति महिना 1 लाख रुपये फिक्स पेन्शन मिळणार Gratuity Money Amount | तुमचा महिना पगार किती? खाजगी कंपनी नोकरदारांना ग्रॅच्युईटीचे 1,06,731 रुपये मिळणार EPFO Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला महिना रु.7500, रु.6429, रु.5357 की रु.4286 पेन्शन मिळणार? अपडेट आली Horoscope Today | 11 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 11 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | खुशखबर! मल्टिबॅगर पेनी स्टॉक फोकसमध्ये, जोरदार तेजीचे संकेत - NSE: RPOWER NBCC Share Price | 28 टक्के कमाईची संधी मिळतेय, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC
x

भारतात कोरोनाग्रस्तांचा चढता आलेख अन केंद्र सरकार म्हणतं वेग मंदावला

Covid 19, Corona Crisis

नवी दिल्ली, २४ एप्रिल: भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा २३ हजार पार गेला आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या माहितीनुसार शुक्रवार सकाळपर्यंत देशात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ही २३ हजार ७७ वर पोहोचली. यापैकी १७ हजार ६१० रुग्ण हे कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार घेत आहेत. तर ४ हजार ७४९ रुग्ण हे बरे झाले आहेत किंवा त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर आतापर्यंत ७१८ जणांनी आपले प्राण गमावले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २४ तासांत देशात १६८४ नवे रुग्ण समोर आले आहेत तर ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातल्या आकडेवारीचा विचार करायचा झालाच तर गेल्या २४ तासांत जगभरात कोरोनामुळे ४ हजार ५०० लोकांनी आपला प्राण गमावला आहे, त्यामुळे शुक्रवार सकाळपर्यंत संपूर्ण जगात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही १ लाख ८६ हजार ४६२ वर पोहोचली आहे. तर एफपी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार जगात २४ तासांत ६८ हजार १७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात दिवसागणिक वाढतच चालाला आहे. एक एप्रिलपासून २३ एप्रिलपर्यंत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सहा पटीनं वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. दररोज करोनाग्रस्तांच्या संख्येत होणारी वाढ देशासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी भारतामध्ये जवळपास महिनाभरापासून लॉकडाउन घेण्यात आला आहे. तरीही करोनाग्रस्तांच्या संख्येत कमी झालेली दिसून येत नाही.

महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि राज्यस्थानसारख्या मोछ्या राज्यात करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. करोनानं भारतात शिरकाव केल्यानंतर सर्वाधिक रूग्ण असलेल्या केरळ राज्यानं देशांसमोर आदर्श ठेवला आहे. कमी लोकसंख्या असणारी भारतातील ३ राज्य कोरोनामुक्त झाले असून गोवा, मणिपूर आणि त्रिपुरा या राज्यांनी कोरोनाशी दोन हात करून आपल्या राज्याला कोरोना फ्री केलं आहे. मात्र देशातील एकूण आकडेवारी पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालय जरा घाई करतंय असंच तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

 

News English Summary: The number of corona victims in India has crossed 23,000. According to the latest data released by the Ministry of Health, the number of corona virus cases in the country has reached 23,077 by Friday morning. Of these, 17,610 patients are being treated for corona virus infection. 4 thousand 749 patients have been cured or discharged. So far 718 people have lost their lives.

News English Title: Story Corona virus active cases in India graph Since 1st April increasing ratio Covid 19 News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या