1 May 2024 5:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल Vesuvius Share Price | अल्पावधीत 400% परतावा देणाऱ्या शेअरची एकदिवसात 15% उसळी, खरेदीला ऑनलाईन गर्दी
x

संजय राऊत आणि ममता बॅनर्जी भेट, 'तिसऱ्या आघाडी'ची चर्चा ?

नवी दिल्ली : सध्या दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसेवा ममता बॅनर्जी यांच्या दरम्यान आज राजकीय भेट झाली आहे. ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली होती.

दिल्लीतील या राजकीय पक्षांच्या भेटी-गाठीने भाजपाविरुद्ध २०१९ पूर्वीच तिसऱ्या आघाडीची चर्चा जोर धरू लागली आहे. ममता बॅनर्जी यांनी आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली होती. चंद्राबाबू नायडू हे आधीच मोदीसरकार विरोधात आक्रमक झाले असताना, मागील आठवड्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांनी सुद्धा तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या उद्देशाने तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती.

शरद पवार यांनी या भेटीचं वृत्त फेटाळलं असलं तरी शिवसेनेच्या वतीने संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी भेट झाल्याची बातमी ट्विटरवरून दिली आहे.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x