5 May 2024 2:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या
x

मान्सूनचं आगमन ४ दिवस उशिराने, केरळमध्ये ५ जूनला दाखल होणार

Monsoon Delay in Kerala

मुंबई, १५ मे : उकाड्यानं हैराण झालेले नागरिक आणि बळीराजा भाताच्या पेरणीसाठी मान्सूनची आतूरतेनं वाट पाहात असतो. मान्सून वेळत आला तर शेतीची कामं योग्य मार्गी लागतात. मान्सून येण्यास विलंब झाला तर पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता असते. जून ते सप्टेंबर या कालावधित चांगला पाऊस होणं हे पाणी शेतीच्या दृष्टीनं फायद्याचं असतं. दक्षिण भारतातून मान्सून उत्तरेकडे येत असतो. यंदा मान्सून ४ दिवस उशिरानं येणार आहे. १ जून ऐवजी ५ जूनला केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

यंदाचा मान्सुनचा पाऊस केरळमध्ये ५ जून रोजी म्हणजे थोडक्यात विलंबाने दाखल होण्याची शक्यता गुरुवारी भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख १ जून आहे. शिवाय सुधारित वेळापत्रकानुसार मान्सूनचा महाराष्ट्रासह देशातील मुक्कामदेखील वाढला आहे. – कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग

दिल्लीमध्ये मान्सून २३ जून ऐवजी २७ जून रोजी दाखल होईल तर मुंबईमध्ये १० जून ऐवजी ११ ला दाखल होणार होता त्याऐवजी तो पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सून पाऊस सामान्य होईल. त्यानुसार २०२० मध्ये मान्सून सरासरीच्या १०० टक्के म्हणजे चांगला होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

News English Summary: This year’s monsoon rains are likely to arrive in Kerala on June 5, a short delay, the Indian Meteorological Department said on Thursday. The average date of onset of monsoon in Kerala is June 1.

News English Title: We have to wait for the arrival of monsoon this year will arrive in Kerala on 5th June 2020 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x