12 December 2024 6:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

आदित्य ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

Environment minister Aaditya Thackeray, PM Narendra Modi, Exams Issue

मुंबई, २४ ऑगस्ट : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आला. आता या परिक्षा ऑनलाईन घेण्याची तयारी दर्शवली होती. याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी कोरोना काळात परिक्षा न घेण्यासंदर्भातील पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले आहे. या पत्रात आदित्य ठाकरेंनी परिक्षेच्या विषयात लक्ष घालण्याचे केले आवाहन मोदींना केले आहे.

कोरोना संकटामुळे ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष उपस्थित राहूनही परिक्षा न घेण्याची विनंती या पत्रातून करण्यात आली आहे. महाराष्ट्रात शैक्षणिक वर्षाची सुरूवात जून २०२० ऐवजी जानेवारी २०२१ पासून सुरू करण्यावर विचार असल्याचे देखील या पत्रात नमूद केले आहे.

“आपल्या नेतृत्वाखाली देश करोनाविरूद्ध लढा देत आहे. यात नागरिकही मोठ्या प्रामाणिकपणे आपलं योगदान देत आहेत. विद्यार्थ्यांकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. करोना रुग्णसंख्या वाढत असल्यानं देशातील बहुतांश जण घरूनच काम करत आहेत. अनेक शैक्षणिक संस्था विद्यापीठ, व्यावसायिक व अव्यासायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्याचं ठरवत आहेत. पण, जगभरात जिथे कुठे शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आली, तिथे मोठ्या प्रमाणात करोना रुग्ण आढळून आले आहेत. हा विषय केवळ विद्यार्थ्यांशी संबंधित नाही, त्यांच्या कुटुंबीय आणि शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचाही आहे. त्यामुळे माझी नम्र विनंती आहे की, या विषयात हस्तक्षेप करून सर्व शैक्षणिक कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावे. त्याचबरोबर आपलं शैक्षणिक वर्ष जून-जुलै २०२० ऐवजी जानेवारी २०२१ पासून सुरू करावं, ज्यामुळे कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही. विविध शाखांच्या परीक्षा आणि प्रवेश पूर्व परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका आहे. त्यामुळे या प्रकरणात पंतप्रधानांनी स्वत: हस्तक्षेप करावा”, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

 

News English Summary: Environment Minister Aaditya Thackeray has sent a letter to Prime Minister Narendra Modi regarding non-conduct of exams during the Corona period. In this letter, Aditya Thackeray has appealed to Modi to pay attention to the subject of exams.

News English Title: Environment minister Aaditya Thackeray Writes To PM Narendra Modi About Exams Issue News Latest Updates.

हॅशटॅग्स

#AadityaThackeray(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x