4 May 2025 2:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचं पॅकेज - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Finance minister Nirmala Sitharaman, package announcement

नवी दिल्ली, १५ मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या विषयी माहिती देण्याकरता आज तिसऱ्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुर देखील उपस्थित आहेत. या पॅकेजअंतर्गत शेती आणि शेतीशी निगडीत इतर उद्योगधंद्याना काय दिलासा मिळणार आहे, यासंदर्भात आज घोषणा केल्या जात आहेत.

कृषि क्षेत्राची क्षमता आणि इन्फ्रास्ट्रक्चर विकसीत करण्यासाठी ११ मोठ्या घोषणा आज करण्यात येणार असल्याची सीतारामन म्हणाल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांंसाठी १ लाख कोटी फंड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर मच्छीमारांसाठी २०,००० कोटी रुपयांंचे अनुदान अर्थमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी गेल्या दोन महिन्यांत अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहेत असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. दोन महिन्यात म्हणजेच लॉकडाउनच्या काळात ७४ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची धान्य खरेदी करण्यात आल्याचंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं. ५६० लाख लीटर दुधाचं संकलन करण्यात आलं. देशातल्या २ कोटी शेतकऱ्यांना व्याजावर सबसिडी देण्यात आली आहे. दूध उत्पादकांना लॉकडाउनच्या काळात ४ हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम दिल्याचंही स्पष्ट करण्यात आलं.

तसेच अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी १०००० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. मत्स्य उद्योगासाठी २०००० कोटींची मदत देण्यात येणार असून पुढील ५ वर्षांत ७० लाख टन उत्पादन घेण्यात येईल. याद्वारे ५५००० नवीन रोजगार उपलब्ध होतील, असे सीतारामन यांनी सांगितले.

 

News English Summary: According to Finance Minister Nirmala Sitharaman, Rs 1 lakh crore will be provided for the infrastructure required for agriculture. A grant of Rs 20,000 crore has been announced by the Finance Minister for fishermen.

News English Title: Union Finance minister Nirmala Sitharaman 20 lack crore economic package announcement on 3rd day News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या