11 May 2025 11:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

वानखेडे स्टेडिअम ताब्यात न घेण्यामागील कारण आदित्य ठाकरेंनी केलं स्पष्ट

Mumbai, Wankhede Stadium, Corona Virus

मुंबई, १७ मे: क्वारंटाइन सेंटर उभारण्यासाठी वानखेडे स्टेडिअम ताब्यात घेतलं जाणार असल्याचं वृत्त चुकीचं असल्याची माहिती महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली आहे. मुंबईतील कोणतंच मैदान ताब्यात घेतलं जाणार नसल्याचं ते म्हणाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे महापौर किशोरी पेडणेकर यांनी वानखेडे स्टेडिअमला भेट देत मैदानाची पाहणी केली होती. सोबतच वानखेडे परिसरातील नागरिकांनी मैदानात क्वारंटाइन सेंटर उभारण्यास विरोध केला होता. त्यानंतर आता महापालिका आयुक्तांनी असा कोणताही विचार नसल्याचं सांगितलं आहे.

दुसरीकडे संजय राऊत ट्विट करत म्हणाले होते की, कोरोनाच्या रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी वानखेडे मैदानाचा वापर केला जाऊ शकतो. तसेच वानखेडेप्रमाणे ब्रेबॉर्न मैदानचा उपयोग देखील क्वारंटाईन रुग्णांना ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो, असा पर्याय संजय राऊत यांनी सुचवला होता. मात्र यावर पावसाळा तोंडावर असताना असे मैदान वापरणे योग्य ठरणार नाही असं मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सांगितले आहे.

आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या मागणीला विरोध करत ट्विटरवरुन उत्तर दिलं. आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की, “आपण स्टेडिअम किंवा खेळाची मैदाने ताब्यात घेऊ शकत नाही. मातीची मैदानं असल्याने तिथे पावसाळ्यात चिखल होऊ शकतो. क्वारंन्टाइनसाठी टणक पृष्ठभूमीची गरज असून त्यावर व्यवस्था करता येईल आणि तशी करत आहोत”.

 

News English Summary: Municipal Commissioner Iqbal Singh Chahal has said that the news that Wankhede Stadium will be taken over for setting up a quarantine center is wrong. He has said that no ground in Mumbai will be taken over. Importantly, Mayor Kishori Pednekar had visited Wankhede Stadium and inspected the ground.

News English Title: Corona virus Lockdown Aditya Thackeray Shivsena Sanjay Raut Wankhede Brabourne Stadium Quarantine Center News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या