17 March 2025 8:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TDS New Rules l पगारदारांनो, 1 एप्रिल 2025 पासून TDS चे नवे नियम लागू, टॅक्स डिडक्शनमध्ये असे बदल होणार Yes Bank Share Price | येस बँक गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, शेअर्स प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK Rattan Power Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ आला पेनी स्टॉक, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, शेअर प्राईस 42 रुपये, मिळेल 56% परतावा - NSE: IRB Horoscope Today | 18 मार्च 2025, कसा असेल तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस, तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 18 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या GTL Infra Share Price | शेअर प्राईस 1 रुपया 49 पैसे, 492% परतावा देणारा पेनी स्टॉक फोकसमध्ये - NSE: GTLINFRA
x

खात्री बाळगा, अशी चूक करणार नाही | अमृता फडणवीस यांचा खडसेंना टोला

Amrita Fadnavis, Eknath Khadse, Devendra Fadnavis, Marathi News ABP Maza

मुंबई, १२ सप्टेंबर : गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. एमआयडीसीची कथित जमीन माझ्या बायको आणि जावयाने घेतली. मी मंत्री असताना माझ्या कुटुंबाने व्यवहार करायचे नाहीत का? समजा अमृता फडणवीस यांनी एखादा व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांनी केलेला पदाचा गैरवापर होतो का?, असा सवाल खडसे यांनी केला होता. यास आता अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एकनाथ खडसे यांना प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे की, ‘तुम्ही खात्री बाळगा एकनाथ खडसेजी, तुमच्या जीवनातून खूप काही शिकल्यामुळे मी अशी चूक करणार नाही. सर्वांचे भले होवो, असा टोलादेखील अमृता फडणवीस यांनी खडसे यांना लगावला आहे.

काय म्हणाले होते खडसे?
“एमआयडीसीच्या जमिनीशी आपला संबंध नसून आपला व्यवहारही झालेला नाही. उताऱ्यावर मूळ मालकाचे नाव असून एमआयडीसीचे नाव नंतर आहे. मी महसूलमंत्री होतो म्हणून पदाचा गैरवापर करण्याचा संबंध काय येतो? माझ्या बायको आणि जावयानं व्यवहार करायचे नाहीत का? असा सवाल खडसे यांनी केला होता. तसंच समजा अमृता फडणवीस यांनी व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का? किंवा त्यांनी एखादा कार्यक्रम केला, तर काय फडणवीस यांच्या आशीर्वादाने झाला असं होतें का? जशा त्या स्वतंत्र आहेत तशीच माझी पत्नीही आहे. याव्यतिरिक्त माझे जावई एनआरआय आहेत. त्यांनाही हे अधिकार आहेत असं खडसे म्हणाले होते.

 

News English Title: Replying to Eknath Khadse from her Twitter account, Amrita Fadnavis said, “You can be sure, Eknath Khadseji, I will not make such a mistake as I have learned a lot from your life. For the betterment of all, Amrita Fadnavis has also imposed a toll on Khadse.

News English Title: Amrita Fadnavis reply to BJP senior leader Eknath Khadse Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x