29 April 2024 8:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

देशात कोरोना रुग्णांचा आकडा १.१२ लाखाच्या वर, तर ५,६०९ नवे रुग्ण

Covid 19, Corona virus, India

नवी दिल्ली, २१ मे: जगभरात कोव्हिड १९ मुळे कोट्यवधी लोकांच्या मृत्यूनंतरही कोरोना विषाणूचा नाश होण्याची चिन्ह नाहीत. भारतातही कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आता लॉकडाउनचे चार टप्पे लागू करण्यात आले आहेत, परंतु तरीदेखील रुग्णांची संख्या वाढतच आहे. देशातील कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली असून जगभरात ती ११ व्या स्थानावर आहे.

गुरुवारी ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना विषाणूची ११२३५९ प्रकरणं नोंदवली गेली आहेत आणि ३४३५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरात विचार केला तर कोरोनाच्या प्रकरणांची संख्या ५० लाखांच्या पुढे गेली आहे.

दरम्यान मागील चोवीस तासांत देशात तब्बल ५ हजार ६०९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर १३२ जणांचा करोनाने बळी घेतला आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १ लाख १२ हजार ३५९ वर पोहचली आहे. या मध्ये सध्या उपचार सुरू असलेले ६३ हजार ६२४ रुग्ण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या ३ हजार ४३५ जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यता आलेली आहे.

भारतात वैद्यकीय हाताळणी प्रभावीपणे केली जात असल्याने एक लाख लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण फक्त ०.२ टक्के आहे. जगभरातील सरासरी ४.२ टक्के असल्याचे अगरवाल म्हणाले. उपचार होत असलेल्या रुग्णांपैकी २.९ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज असून ३ टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. ०.४५ रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छसावर ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

News English Summary: According to the latest figures on Thursday, 112359 cases of corona virus have been reported in the country and 3435 people have died. If you think about it, the number of cases of corona has gone up to 50 lakhs worldwide.

News English Title: Corona virus Spike Of 5609 Covid 19 Cases 132 Deaths In The Last 24 Hours News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x