4 May 2024 10:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार? Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

जम्मू काश्मीर: सतर्क जवानांनी उधळून लावला पुलवामासारखा मोठा हल्ला

A Major Incident, Vehicle Borne Ied Blast, Jammu Kashmir, CRPF

जम्मू, २८ मे: दहशतवाद्यांच्या पुलावामासारख्या हल्ल्याची योजना लष्कराच्या जवानांच्या सतर्कतेमुळे टळल्याची माहिती समोर आली आहे. पुलवामानजीक एका सँट्रो गाडीमध्ये IED (इंम्प्रोव्ह्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस) बसवण्यात आले होते. दरम्यान, बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकानं वेळेत हा बॉम्ब निकामी केल्यानं मोठा अनर्थ टळला.

प्राथमिक माहितीनुसार, ४४ राष्ट्रीय रायफल्स, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि पुलवामा पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत ही स्फोटके जप्त करण्यात आली. चार ते पाच दिवसांपूर्वी सुरक्षादलांना एका कारमधून स्फोटके आणण्यात आल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांकडून या कारचा कसून शोध घेतला जात होता.

एक दहशतवादी ही गाडी चालवत होता. परंतु सुरूवातीला करण्यात आलेल्या गोळीबारानंतर तो गाडी सोडून पळून गेला असल्याचं सांगण्यात येत आहे. अंधाराचा फायदा घेऊन दहशतवाद्यानं त्या ठिकाणाहून पळ ठोकला. दरम्यान, हे प्रकरण आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात येणार आहे. ही गाडी पुलवामातील रजपुरा रोडनजीक असलेल्या शादीपुरा येथून ताब्यात घेण्यात आली. पांढऱ्या रंगाच्या या गाडीला दुचाकीची नंबर प्लेट लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही गाडीची कठुआमध्ये नोंदणी केल्याची माहितीही समोर आली आहे.

त्यामुळे दहशदवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला गेल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी दिली. भारतीय जवान याठिकाणी पोहोचले तेव्हा दहशतवादी कारमध्ये होते. मात्र, जवानांना बघून त्यांनी पळ काढला. दरम्यान, गेल्या वर्षी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. हा हल्ला अशाच प्रकारे होता. त्यावेळीही दहशतवाद्यांनी कारमध्येच बॉम्ब ठेवले आणि कारसह सीआरपीएफच्या ताफ्यात घुसले होते. फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात जवळपास ४५ जवान शहीद झाले होते.

 

News English Summary: According to preliminary information, the explosives were seized in a joint operation by 44 National Rifles, Central Reserve Police Force (CRPF) and Pulwama police. Four to five days ago, security forces received information that explosives had been brought from a car. The car was then searched by security forces.

News English Title: A Major Incident Of A Vehicle Borne Ied Blast Averted By The Timely Input News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IndianArmy(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x