24 April 2024 1:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअर सहित हे 5 शेअर्स खिसे भरणार, 44 टक्केपर्यंत परतावा सहज मिळेल GTL Share Price | मालामाल करणार स्वस्त GTL शेअर! देईल 200 टक्के परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या TTML Share Price | टाटा ग्रुपचा सर्वात स्वस्त शेअर तेजीत, 2 दिवसात दिला 14% परतावा, यापूर्वी 2926% परतावा दिला
x

३१ मे नंतरही लॉकडाऊन उठवणार नसल्याचे संकेत - सविस्तर वृत्त

Lockdown, Maharashtra, Corona Virus

मुंबई, २८ मे: लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत असताना त्यानंतर लॉकडाऊन पूर्णपण उठवला जाणार नाही, असे स्पष्ट संकेत मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडून राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. राज्यातील अर्थचक्र सुरु करण्यासाठी ३१ मेनंतर लॉकडाऊनध्ये आणखी शिथिलता दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केलंय. ग्रीन झोनमध्ये बऱ्यापैकी व्यवहार सुरु करण्याचा राज्याचा विचार आहे. मात्र, यासाठी काही निमय व अटी निश्चित घालण्यात येणार आहेत. नियम व अटींचे उल्लंघन केल्यास हे व्यवहार बंद केले जातील याची कल्पना नागरिकांना देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात.

आज ८० टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत, स्थलांतरित आणि लॉकडाऊन शिथिल केल्याने प्रवास करीत असलेल्या नागरिकांमुळे ज्या जिल्ह्यांत रुग्ण नव्हते तिथेही प्रादुर्भाव दिसू लागला आहे. एकीकडे राज्याचे अर्थचक्र सुरु करीत असलो तरी त्यामुळे आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढते हे लक्षात घेऊन विषाणूचा पाठलाग जास्त गांभीर्याने करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिले. याप्रसंगी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील सर्व नागरिकांना कॅशलेस उपचार देणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य या देशातील महत्वाकांक्षी योजनेची जिल्ह्यांत काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे सांगितले. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी देखील महत्वपूर्ण सूचना दिल्या.

दरम्यान, राज्यात काल १०५ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. तर दिवसभरात तब्बल २ हजार १९० नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या आता ५६ हजार ९४८ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ९६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत काल १००२ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३२ हजार ९७४ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ३९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील कोरोनाबळींची संख्या १०६५ वर पोहोचली आहे.

मुंबईपाठोपाठ पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. पुण्यात काल दिवसभरात तब्बल ११ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे येथे आतापर्यंत २८४ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात १०६ नवीन रुग्णांची भर पडल्याने पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५५३३ वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यात काल सर्वाधिक १०५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबळींची संख्या १८९७ इतकी झाली आहे.

 

News English Summary: As the fourth phase of the lockdown ends on May 31, the lockdown will not be fully lifted after that, Chief Minister Uddhav Thackeray has given a clear signal. Yesterday, the Chief Minister took stock of the situation in the state from all the District Collectors and Divisional Commissioners. He further clarified that the lockdown would be further relaxed after May 31 to start the economic cycle in the state.

News English Title: Maharashtra State Corona virus lockdown will not be lifted after 31st May says CM Uddhav Thackeray News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x