27 April 2024 7:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असल्याने प्रशासनाची चिंता वाढली

Corona, covid 19 positive patients, Pune

पुणे, २८ मे: कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात नव्याने ७५ रुग्ण सापडल्याने बाधितांचा आकडा सात हजाराच्या घरात पोहोचण्यास मदत झाली आहे. तर मृतांची एकूण संख्या ३०० वर पोहोचली आहे.

पुणे शहरात कोरोनाचे थैमान सुरुच आहे. पुण्यात केवळ शहरात साडेपाच हजारांहून अधिक रूग्ण आहेत. पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७५ नवे रुग्ण आढळले असून जिल्ह्यातली कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६ हजार ७१६ इतकी झाली आहे. मुंबईनंतर पुण्यात कोरोनाबाधित रुग्ण जास्त असल्याचे दिसून येत आहे. राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात ११.५ दिवस होता तो काल १४.७ दिवस झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३१.५ टक्के एवढे आहे. मात्र, पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे

दरम्यान, राज्यात काल १०५ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. तर दिवसभरात तब्बल २ हजार १९० नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या आता ५६ हजार ९४८ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ९६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत काल १००२ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३२ हजार ९७४ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ३९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील कोरोनाबळींची संख्या १०६५ वर पोहोचली आहे.

 

News English Summary: Outbreaks appear to be exacerbated during this time. Concerns are being raised as the number of corona cases is increasing in Pune district. The discovery of 75 new patients in Pune has helped the number of affected people reach 7,000. The death toll has risen to 300.

News English Title: Corona covid 19 positive patients is increasing in Pune News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x