6 May 2024 10:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या
x

चिंता वाढली! कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूसंख्येत भारत चीनच्याही पुढे गेला

India, Lockdown, Corona Virus

नवी दिल्ली, २९ मे : चीनपासून जगभरात पसरलेल्या कोरोनाव्हायरस संसर्गाचा परिणाम भारतात वेगाने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७४६६ नवीन रुग्ण आढळले. कोरोनाची नवीन प्रकरणं अस्तित्त्वात आल्याने देशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या वाढून १,६५,७९९ झाली आहे.

मागील २४ तासांत देशात १७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ४७०६ जणांचा करोनानं बळी घेतला आहे. मृत्यूंच्या बाबतीत भाराताने चीनलाही मागे टाकले आहे. भारतामध्ये एकूण करोनाग्रस्तांची संख्या एक लाख ६५ हजार सातशे ९९ झाली आहे. यापैकी ८९ हजार ९८७ जणांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशातील ७१ हजार १०५ जणांनी करोनावर मात केली आहे.

भारतात कोरोनाविरूद्ध ९ औषधांची चाचणी सुरू आहे. नीति आयोग (आरोग्य) सदस्य व्ही के पॉल यांनी याबाबत माहिती दिली. देशातील सुमारे २० नवीन कंपन्या कोविड १९ साठी चाचणी किट बनवित आहेत. जुलैपर्यंत देशात दररोज 5 लाख देशी किट तयार होतील. कोरोनाच्या विरूद्ध भारत अनेक लस चाचण्या घेत असल्याची माहिती पॉल यांनी दिली. कोविड १९ विरुद्धची अंतिम लढाई केवळ लसीद्वारेच जिंकली जाईल. आपल्या देशात त्यासाठी प्रयत्न सुरू आहे अशी माहिती व्ही के पॉल यांनी दिली आहे.

मृत्यूंच्या संख्येत अमेरिकाच पहिल्या क्रमांकावर असून आतापर्यंत १ लाखाहून अधिक करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर अनुक्रमे इंग्लंड, इटली, फ्रान्स, स्पेन, ब्राझिल, बेल्जिअम, मेक्सिको, जर्मनी आणि इराण पहिल्या १० देशांच्या यादीत आहेत. भारत मृत्यूसंख्येत १३ व्या स्थानी आहे. ११ आणि १२ व्या क्रमांवर कॅनडा आणि नेदरलँड आहेत.

 

News English Summary: Coronavirus infection from China is spreading rapidly in India. In the last 24 hours, 7,466 new cases of corona have been detected, according to the Ministry of Health. With the emergence of new cases of corona, the number of patients infected with corona in the country has increased to 1,65,799.

News English Title: Coronavirus Lockdown India Overtakes China In Deaths Reached On Number 9 On Global Chart News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x