3 May 2024 6:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

कंत्राटी डॉक्टर आणि बंधपत्रित डॉक्टरांचं मानधन समान करण्याचा निर्णय

Maharashtra Govt, Increase Payment, Doctors On Contract And Bond

मुंबई, २९ मे: राज्य सरकारनं बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्याबरोबरच कंत्राटी डॉक्टरांचे आणि बंधपत्रित डॉक्टरांचं मानधन समान करण्याचा निर्णय घेतला आहे. बंधपत्रित आणि कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मोठा निर्णय घेतला. बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधना वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर राज्यात कंत्राटी पद्धतीनं कार्यरत असलेल्या डॉक्टरांनाही सरकारनं दिलासा दिला आहे. कंत्राटी डॉक्टरांचं आणि बंधपत्रित डॉक्टारांचं मानधन समान करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला.

दुसरीकडे, राज्यातील विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. खाजगी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना नियमित वेतन देण्यास शाळा व्यवस्थापन टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने ज्या शाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देणार नाहीत अशा शाळांची मान्यता रद्द करण्याच्या सूचना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.

राज्यात २३ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन लागू झाल्यापासून शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शाळा बंद झाल्यानंतर काही खाजगी विनाअनुदानित शाळांच्या व्यवस्थापनाने शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार थकवले आहेत. पगार देण्याची जबाबदारी शासनाची असल्याचे काही खाजगी विनाअनुदानित शाळांचे व्यवस्थापन शिक्षकांना सांगत आहे. मात्र खाजगी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक आणि कर्मचार्‍यांचे वेतन देण्याची जबाबदारी संबंधित शाळा व्यवस्थापनाची असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

 

News English Summary: The state government has decided to increase the honorarium of bonded doctors as well as the honorarium of contract doctors and bonded doctors. On Friday, Chief Minister Uddhav Thackeray took a big decision regarding the honorarium of bonded and contract doctors.

News English Title: Maharashtra Govt Increase Payment Of Doctors On Contract And Bond News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x