3 May 2025 2:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

आपत्तीमुळे शिवसेना शाखांचे दवाखाने होणार; उद्धव ठाकरे लवकरच आदेश देणार

Shivsena shakha, private clinic, Corona Virus

मुंबई, ३० मे: महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ८ हजार ३८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ही संख्या गेल्या अनेक दिवसांमधली विक्रमी संख्या आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ३३ हजार १२४ ऍक्टिव्ह रुग्ण आहे. तर २६ हजार ९९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या ३३ हजारांमध्येही एक जमेची बाजू ही आहे की ८३ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं नाहीत. उर्वरीत जे १५-१६ टक्के जे रुग्ण आहेत त्यांना मध्यम प्रकारात मोडणारी लक्षणं दिसत आहेत. सध्याचा आपला रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ४३ टक्के इतकं आहे. तर मृत्यूदर हा ३.३ टक्के आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

दुसरीकडे मुंबईतील खासगी दवाखाने वारंवार सांगूनही आपले दरवाजे उघडत नाहीत. यामुळे करोना सोडून इतर व्याधींनी ग्रस्त असलेल्या मुंबईकर नागरिकांना दवाखान्यांसाठी दारोदारी फिरावे लागते. सर्वांना कायद्याचा बडगा दाखवून चालत नाही आणि माणुसकी दाखवली पाहिजे म्हणून ज्या पद्धतीने शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात मराठी तरुण शाखा शाखांमधून मोठ्या संख्येने आपली नोंद करत समाजकार्याला स्वतःला वाहून घेत होते, आता त्याच धर्तीवर शिवसेना शाखा या खासगी दवाखाने करण्यात येणार असून यासाठी लवकरच शाखाप्रमुख यांना आदेश देणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

संकटाच्या काळात आणि आपत्कालीन परिस्थितीत शिवसैनिक हा कायम पुढे असतो. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून शिवसेनेच्या शाखांमध्ये तात्पुरते दवाखाने तुम्हाला कार्यरत दिसतील, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईतीत निवडक संपादकांच्या चर्चेत व्यक्त केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक, दादर (जुना महापौर बंगला) येथे सुमारे तासभर झालेल्या चर्चेत करोनाबाबतच्या उपाययोजना आणि राज्य सरकारची तयारी याबाबत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव भूषण गगराणी, विकास खरगे, शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर, माहिती संचालनालयाचे संचालक अजय आंबेकर, मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अनिरूद्ध अष्टपुत्रे, शिवसेेनेचे जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान उपस्थित होते.

 

News English Summary: Shiv Sena party chief and state chief minister Uddhav Thackeray said that a large number of Marathi youth were registering themselves from the branches and carrying out social work.

News English Title: Shivsena shakha will be made a private clinic for treatment News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या