3 May 2024 9:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईला असलेला धोका टळला; तरी खबरदारी घेणं सुरु

nature Cyclone

मुंबई, ३ जून: जीवघेण्या कोरोनाचा मुकाबला करत असतानाच महाराष्ट्रासमोर आणखी एक संकट उभं राहिलंय. ‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागला धडकलं असून याठिकाणी तशी १०० ते १२० किमीच्या वेगाने वारे वाहत असून तुफान पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अलिबाग आणि मुरुडचा समुद्र प्रचंड खवळला असून रोहा, श्रीवर्धन, माणगाव, पेण आणि खोपोलीलाही बसला असून याठिकाणी घरे, झाडं, इमारतींवरील छप्परे आणि विजेचे पोल अगदी पालापाचोळ्यासारखे पडल्याचे धक्कादायक दृश्य पाहायला मिळत आहे.

दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईला असलेला धोका टळला असल्याची माहिती स्कायमेटनं दिली आहे. अलिबागच्या किनारपट्टीवर दुपारी एकच्या सुमारास धडकलेलं चक्रीवादळ सध्या ठाणे, पालघर पट्ट्यात आहे. इथून ते पुढे उत्तर महाराष्ट्राच्या दिशेनं जाण्याची शक्यता आहे. वादळ मुंबईच्या बाजूनं थोडं पुढे सरकलेलं असलं तरीही हवामान विभागानं दिलेला धोक्याचा इशारा कायम आहे. त्यामुळे पुढील काही तास मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचे असतील.

अलिबागला धडकलेलं वादळ मुंबईला येण्याची शक्यता व्यक्त झाल्यानं शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज होती. दुपारी एक ते दीडच्या सुमारास अलिबागला धडकलेल्या धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका मुंबईलादेखील बसला. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरील कुलाबा येथील गीतानगर, वरळी कोळीवाडा, दादर, माहीम, जुहू आणि वर्सोवा परिसरात मोठया पावसाने हजेरी लावली. पाऊस धो धो कोसळत असतानाच वेगाने वाहणारे वारे देखील मुंबईकरांच्या मनस्तापात भर घालत होते. सकाळपासून सुरु असलेला पाऊस कोसळत असतानाच वादळ धडकण्याच्या म्हणजे दुपारच्या वेळी पावसाचा वेग ठिकठिकाणी वाढला. त्यामुळे मुंबईकरांना धडकीच भरली.

 

News English Summary: Skymet has informed that the threat of nature cyclone to Mumbai has been averted. The cyclone that hit the coast of Alibag at around 1 pm is currently in Thane, Palghar belt. From here it is likely to move towards North Maharashtra.

News English Title: Natures cyclone threat to Mumbai averted But still careful though News Latest Updates.

 

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x