29 April 2024 3:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत
x

पावसामुळे मुंबईत सखल भागांत पाणी साचायला सुरुवात

Mumbaikar, Mumbai, Rain

मुंबई, ४ जून: काल रत्नागिरी, रायगड आणि पुण्याला ‘निसर्ग’ चक्रीवादळाने झोडपले. या वादळाचा तडाखा मुंबईलाही बसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र रायगडकडून वादळाने दिशा बदलली, त्यामुळे मुंबईवरील धोका टळला. परंतु तरीही काल मुंबईत पावसाने वादळी वाऱ्यासह जोर धरला होता. त्यांनतर मुंबईकरांची आजच्या दिवसाची सुरुवातही पावसानेच झाली आहे. मुंबईच्या सीएसएमटी, दादर, माटुंगा, पवई, चेंबूर, कुर्ला इत्यादी भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, एकीकडे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढतेय, तर दुसरीकडे मुंबईकरांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागतोय. काल झालेल्या पावसामुळे मुंबईत काही ठिकाणी झाड कोसळल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पुण्यात रात्री उशिरा पावसाने झोडपल्याने मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून रस्त्यावर पडली आहे. पावसाने जोर धरल्याने अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या वाऱ्यामुळे भीमा खोऱ्यात टेमघर आणि कृष्णा खोऱ्यातील मोळेश्वर कण्हेर येथे सर्वाधिक पाऊस पडला. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरणात मंगळवारपासून पाऊस आहे.

 

News English Summary: Mumbaikars have started the day with rain. Heavy rains have lashed parts of Mumbai’s CSMT, Dadar, Matunga, Powai, Chembur, Kurla and other areas. This rain has started accumulating water in many low lying areas.

News English Title: Mumbaikars have started the day with rain Heavy rains have lashed parts of Mumbai News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x