9 May 2024 5:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं? Railtel Share Price | रेलटेल शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी सांगितली पुढची टार्गेट प्राईस
x

महाराष्ट्रात नव्या २५५३ रुग्णांची भर, १०९ रुग्णांचा मृत्यू, संख्या ८८ हजारांच्याही पुढे

Maharashtra, Covid 19, Corona Virus

मुंबई, ८ जून: आज राज्यात कोरोनाचे एकूण २५५३ नवे रुग्ण सापडल्याने एकूण बाधितांचा आकडा ८८ हजार ५२८ वर पोहोचला आहे. तर, आज एकूण १०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने ही माहिती दिली. आज दिवसभरात १६६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४० हजार ९७५ वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात सद्या एकूण ४४ हजार ३७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ६४ हजार ३३१ नमुन्यांपैकी ८८ हजार ५२८ नमुने पॉझिटिव्ह (१५.६८ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ६४ हजार ७३६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ७५९ खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ७६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १०९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे.आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ७० (मुंबई ६४, कल्याण-डोंबिवली २, उल्हासनगर १, वसई-विरार १, भिवंडी १, ठाणे १), नाशिक- १३ (नाशिक २, जळगाव ६, धुळे ४, अहमदनगर १), पुणे- १३ (पुणे ७, सोलापूर ६), कोल्हापूर- ३ (रत्नागिरी ३),औरंगाबाद-९ (औरंगाबाद ८, जालना १), लातूर-१ (नांदेड १).

गेल्या २४ तासांमध्ये नोंदवण्यात आलेल्या १०९ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील वायचे ५९ रुग्ण होते. तर ४४ रुग्णांचे वय ४० ते ५९ या वयोगटातले होते. ६ रुग्णांचे वय ४० किंवा त्यापेक्षा कमी होते. ज्या १०९ रुग्णांचे मृत्यू झाले त्यापैकी ७९ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार असे जोखमीचे आजार होते. आज झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ३२ मृत्यू हे गेल्या दोन दिवसांतील आहेत. तर उर्वरित मृत्यू हे ३ मे ते ५ जून या कालावधीतील आहेत.

आजपर्यंत ५ लाख ६४ हजार ३३१ नमुन्यांपैकी ८८ हजार ५२८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात ५ लाख ६४ हजार ७३६ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर २७ हजार ७६० लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

 

News English Summary: 2553 fresh cases of COVID19 and 109 deaths recorded in Maharashtra today, taking total number of cases to 88,528 & death toll to 3169. Number of active cases stands at 44374 Maharashtra Health Department News Latest Updates.

News English Title: 2553 fresh cases of COVID19 and 109 deaths recorded in Maharashtra today News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x