4 May 2025 12:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

पावसाळ्यात मुंबईमध्ये कोरोना विषाणूचे प्रमाण अधिक वाढेल - आयआयटी अहवाल

Mumbai Corona Virus, IIT Report, Monsoon

मुंबई, ११ जून : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतेय. काल एका दिवसात तब्बल 3 हजार 254 नवीन रुग्णांनी नोंद झाल्याने राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 94 हजार 41 वर पोहोचली आहे. यापैकी 44 हजार 517 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले असून 46 हजार 74 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच काल 149 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने राज्यातील कोरोनाबळींची संख्या 3 हजार 438 वर पोहोचली आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईत काल दिवसभरात 1 हजार 567 नवीन रुग्ण आढळून आले असून 97 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 हजार 667 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 1 हजार 857 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. आयआयटी मुंबईने नुकत्याच सादर केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, येत्या पावसाळ्यात मुंबईत कोरोना विषाणूचे प्रमाण अधिक वाढेल. आयआयटी मुंबईच्या अभ्यासानुसार पावसाळ्यात कोरोना विषाणूची लागण होण्याची तीव्रता अधिक वाढेल. अभ्यासाचा असा दावा आहे की आर्द्रता वाढल्यामुळे कोरोना विषाणू दीर्घकाळ वातावरणात जिवंत राहू शकतो. हा अभ्यास आयआयटी मुंबईच्या दोन प्राध्यापकांनी केला आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, खोकला किंवा शिंकलेल्या थेंबाला जास्त तापमान आणि कमी आर्द्रतेमुळे कोरडे पडण्यास कमी वेळ लागतो. परंतु पावसाळ्यात ओलावा राहील आणि लोकांचा खोकला कोरडा होण्यास जास्त वेळ लागेल. यामुळे, संसर्ग होण्याची आणि पसरण्याची शक्यता आहे. हे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

इतर देशांतील प्रकरणांचा देखील संशोधनासाठी समावेश आहे. या ताज्या संशोधनानुसार, थेंब कोरडे (ड्रॉपलेट) होण्यासाठी सिंगापूरने कमी लागला आणि जास्त वेळ न्यूयॉर्कमध्ये लागला. म्हणूनच न्यूयॉर्क हे जगातील कोरोना संक्रमणाने सर्वाधिक प्रभावित झालेल्या शहरांपैकी एक आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

 

News English Summary: According to a recent report by IIT Mumbai, the corona virus is likely to increase in Mumbai in the coming monsoons. According to a study by IIT Mumbai, the incidence of corona virus will increase during monsoons.

News English Title: According to a study by IIT Mumbai the incidence of corona virus will increase during monsoons News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या