27 April 2024 4:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | सरकारी कंपनीचा शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार Mutual Fund SIP Top-Up | SIP टॉप-अप करून चौपट कमाई करा, SIP रु. 2000 आणि मिळतील 17 लाख 36 हजार रुपये Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या
x

कोरोनाची आणखी २ लक्षणं समोर...नवंनव्या लक्षणांनी गुंता वाढतो आहे

symptoms, corona Virus, News Latest Updates

नवी दिल्ली, १३ जून : देशात कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या लोकांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी शुक्रवारी रात्री दहा वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात संक्रमणाचे एकूण प्रमाण ३,००,५१९ वर पोहोचले आहे, तर मृतांची संख्या ८८७२2 वर पोहोचली आहे. तसेच, १.५२ लाख रुग्ण बरे झाले आहेत. महाष्ट्राने चीन आणि कॅनडालाही मागे टाकले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. देशात महाराष्ट्र पहिला क्रमांकावर राहिला आहे.

आरोग्य मंत्रालयाकडून कोरोना लक्षणांमध्ये आणखी काही संभाव्य लक्षणांचा समावेश करण्यात आला आहे. वास घेण्याची, चव घेण्याची शक्ती अचानक नष्ट होणं या लक्षणांचा कोरोनाच्या नव्या लक्षणांमध्ये समावेश करण्यात आला आहे. तोंडाची चव जाणं, कोणत्याही प्रकारचा वास, गंध न येणं ही कोरोनाची नवी लक्षणं असल्याचं सांगण्यात आलं आहे.

एका विशेषज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ही लक्षणं विशेषत: कोरोना संबंधित नाहीत. कारण फ्लू, ताप किंवा इन्फ्लूएन्झामुळेही (शीतज्वर) व्यक्तीची वास किंवा चव घेण्याची क्षमता बिघडते. परंतु ही कोरोनाची प्राथमिक लक्षणं असू शकतात. ही लक्षणं आढळल्यास त्यानुसार, त्वरीत उपचार करण्यासाठी मदत होऊ शकते.

 

News English Summary: According to one expert, these symptoms are not particularly related to the corona. This is because the flu, fever or influenza (cold) also impairs a person’s ability to smell or taste. But these can be the primary symptoms of corona. If these symptoms occur, it may help to treat them quickly.

News English Title: According to one expert these symptoms are not particularly related to the corona News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x